Headlines

Bhandup LBS Marg Road Collapse; Heavy Rain Havoc


मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत. माटुंगा आणि दादरमध्ये झाडे पडल्याच्या घटना ताज्या असतानाच, आज (शनिवारी) दुपारी भांडूपमध्ये एक मोठी आणि धक्कादायक दुर्घटना घडली. भांडूप पश्चिमेकडील एलबीएस मार्गावर एशियन

.

नेमकी दुर्घटना कशी घडली?

भांडूपमधील सोनापूर परिसरात एलबीएस मार्गालगत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यासाठी खूप खोलवर खड्डा खोदण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून आणि काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, विकासकाने खोदलेल्या खड्ड्याशेजारील जमीन ओली होऊन ठिसूळ झाली. त्यामुळे शनिवारी दुपारी 1:25च्या सुमारास रस्त्याशेजारील फूटपाथ आणि रस्ता थेट खड्ड्यात कोसळला.

कॅमेऱ्यात कैद झाला थरार

रस्ता खचतानाचा प्रसंग स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. रस्ता खचल्यामुळे तिथे असलेले एक मोठे झाड, बांधकाम साइटला लावलेले पत्रे आणि बस स्टॉपचा भागही थेट पाण्यात कोसळताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तसेच रस्त्याखालील अंतर्गत वायरींगही उघडे पडून नुकसान झाले आहे.

प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य आणि वाहतूक बंद

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य धोका टाळण्यासाठी एलबीएस मार्गावरील या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. उर्वरित रस्ताही खचण्याची शक्यता असल्याने, पोलिसांनी या संपूर्ण परिसराला बॅरिकेडिंग करून नागरिकांना तिथे जाण्यास मज्जाव केला आहे.

नागरिकांचा आरोप

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, विकासकाने सुरक्षिततेचे योग्य उपाय न योजता अतिशय खोल खड्डा खोदला होता. तसेच, गटार सफाईच्या कामातही कंत्राटदाराने हलगर्जीपणा केल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे झाला नाही, ज्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

महापालिकेचे आवाहन

सध्या मुंबईत जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

संबंधित बातम्या वाचा…

6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस-वादळाचा धोका:गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई महानगर प्रदेशात सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा जोर अपेक्षेपेक्षा जास्त असून, येत्या 6 तारखेपर्यंत हे संकट कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

पावसाचा कहर:वसईत पुरात अडकलेल्या नागरिकांची थरारक सुटका, मुंबई-ठाणे-पालघर जलमय, महामार्गांवर वाहतूक विस्कळीत

महाराष्ट्रात मान्सूनने आता रौद्ररूप धारण केले असून, मुंबई महानगर प्रदेश (MMR), पालघर, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार, सातारा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सखल भाग जलमय झाले आहेत. रस्ते, रेल्वे, बाजारपेठा आणि निवासी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर PHOTOS: अनेक ठिकाणी कंबरेएवढे पाणी, कुठे झाडे कोसळली; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

मुंबईकरांची सकाळ पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दादर, हिंदमाता, सायन, कुर्ला आणि अंधेरी सबवेसह अनेक सखल भागांमध्ये कंबरेएवढे पाणी साचल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. तर, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. सविस्तर वाचा

राज्यात आडवातिडवा पाऊस:मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार, कोकणात रेड अलर्ट; विदर्भातही पावसाचा जोर

राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र नागरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीमधील शाळांना प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. सविस्तर वाचा

गुजरातमध्ये पूर, 19 जणांचे रेस्क्यू: महाराष्ट्रातही सर्वदूर पाऊस, पालघरमध्ये शाळा – कॉलेज बंद; उज्जैनमध्ये युवक वाहून गेला

मान्सून देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये पोहोचला आहे. पण गुजरात – महाराष्ट्राचे काही भाग याला अपवाद आहेत. तत्पूर्वी या दोन्ही राज्यांमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या मेंडरडा परिसरात समधियाळा गावाजवळ पुराच्या पाण्यात चार गाड्या अडकल्या. त्यात अडकलेल्या 19 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तिकडे महाराष्ट्रातील नालासोपारा येथे रेल्वे स्टेशनबाहेर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. प्रवाशांना पाण्यातून वाट काढत स्टेशनवर पोहोचावे लागत आहे. पालघरमध्ये पावसामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.