Headlines

धोकादायक ठिकाणी रंबलर स्ट्रिप्स, वेगरोधक पट्टे लावणार:नगर-कल्याण महामार्गावर अपघातानंतर 2 महामार्गांवर 8 ब्लॅक स्पॉट्सवर उपाययोजना‎



पुणे-नाशिक आणि कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा पोलिसांनी झिरो फेटल अॅक्सिडेंट’ मोहिमेला सुरुवात केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दो

.

महामार्गांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणामुळे वाहनांचा वेग वाढला असून, गंभीर अपघात होत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक विभाग आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतून दोन्ही महामार्गांवरील ८ धोकादायक ‘ब्लॅक स्पॉट्स’ निश्चित करण्यात आले आहेत. पोलिसांनी संबंधित कंत्राटदारांना पुढील ७ दिवसांत सर्व अपघातप्रवण ठिकाणी रबलर स्ट्रिप्स, वेगरोधक पट्टे आणि रिफ्लेक्टर्स लावण्याचे कडक आदेश दिले आहेत. तसेच महिनाअखेरपर्यंत रस्त्यांची अपूर्ण कामे पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

पाहणीत प्रामुख्याने ८ ठिकाणे सर्वाधिक धोकादायक कल्याण-अहिल्यानगर हायवे: पेमदरा ते राजुरी दरम्यानचे ४ पॉईंट्स (येथे अतिवेग आणि चुकीच्या ओव्हरटेकिंगमुळे अपघात वाढले आहेत). पुणे-नाशिक हायवे: चाळकवाडी टोलनाका परिसर, लंबोदर हॉटेलसमोरील तीव्र वळण, फाउंटन हॉटेलजवळील धोकादायक भाग आणि पिंपळवंडी फाटा. गावाकडे वळणारी वाहने आणि वेगवान ट्रॅफिकमुळे हे भाग अपघातप्रवण बनले आहेत.

अपघातांची चिंताजनक आकडेवारी गेल्या काही वर्षांत या भागात झालेल्या अपघातांची मालिका मृत्यूचे कारण ठरत आहे: . वर्ष २०२४: तब्बल ३२ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू. . वर्ष २०२५ : २० प्राणघातक अपघातांची नोंद. . वर्ष २०२६ : गुंजाळवाडी येथील भीषण एसटी बस अपघातासह आतापर्यंत ६ गंभीर अपघातांची नोंद झाली आहे. ही वाढती मृत्यूची मालिका थांबवण्यासाठी पोलिसांनी आता थेट कृती आराखडा तयार केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *