![]()
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे यावर्षी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत फार कमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील ९ तालुक्यांना जूनच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे चित्र पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठर
.
१४ तालुक्यांचा व्याप असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात जून महिन्यात १३४.९ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत तो ३० टक्क्यांनी कमी आहे. गेल्या पाच वर्षांत या तालुक्याचा सरासरी पाऊस हा १९२.८ मिलीमीटर आहे. ही धक्कादायक बाब अनेकांना खटकली असून यावर्षीच्या कमी पावसामुळे जून महिन्यात त्याभागात पर्यटकांनीही पाठ फिरविली आहे. आकडेवारीचा आधार घेतल्यास यावर्षीचा सर्वात कमी पाऊस भातकुली तालुक्यात पडला. त्यामुळे या तालुक्याची टक्केवारी ही केवळ ६१.९ वर थांबली आहे. त्यापाठोपाठ सर्वात कमी पावसाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर धामणगाव तालुका आला असून तेथील पाऊस हा गेल्या पाच वर्षांतील पावसाच्या तुलनेत ६८.९ टक्के एवढा आहे.
तिसऱ्या क्रमांकावरील चिखलदरा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ७० टक्के, अचलपुर तालुक्यात ७४.५ टक्के, अमरावती तालुक्यात ८१.३ टक्के, तिवसा तालुक्यात ८२.७ टक्के, चांदूर रेल्वे तालुक्यात ९१.५ टक्के, धारणी तालुक्यात ९१.९ टक्के आणि वरुड तालुक्यात ९९.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अशाप्रकारे यावर्षीच्या जून महिन्यातील पावसाने तब्बल ९ तालुक्यांना दगा दिला आहे. दरम्यान हे सर्व तालुके येत्या काही दिवसात सरासरीच्या जवळ पोहोचतील, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकीकडे हे चित्र असले तरी पाच तालुके मात्र पावसाने आबाद केले आहे. जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक १६३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी त्या तालुक्याच्या जून महिन्याच्या सरासरीच्या (११७.७ मिमी) १४६.१ टक्के आहे. त्याखालोखाल अंजनगाव सुर्जी तालुक्यात १४०.१ मिमी (१२९.६%) पाऊस पडला आहे. दर्यापुर (१२६.२ मिमी), नांदगाव खंडेश्वर (१२६.१ मिमी) आणि अचलपूर (११२.१ मिमी) या तालुक्यांमध्येही स्थिती चांगली.
चिखलदऱ्यात पाऊस नसण्याचे कारण असे… ^वृक्षतोड हेच आहे मुख्य कारण चिखलदरा हे पर्वतराजीमध्ये वसलेले उंचावरील ठिकाण आहे. तेथे दरवर्षी पाऊस जास्त पडतो. परंतु यावर्षी अल नीनो सोबतच गेल्या वर्षभरात झालेली वृक्षतोड हे त्यामागचे मोठे कारण आहे. चिखलदरा शहरासह शहापुर, आलाडोह, मोथा, लवादा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. त्यामुळेदेखील पाऊस कमी पडला, हे वास्तव आहे. – प्रा. अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, अमरावती.