मुंबईच्या खवळलेल्या समुद्रात मुसळधार पाऊस आणि खराब हवामानाचा सामना करत, भारतीय नौदलाच्या ‘सी किंग’ हेलिकॉप्टरने एका ३० वर्षीय जखमी खलाशाचे प्राण वाचवले आहेत. शनिवारी मुंबईतील ‘आयएनएस शिक्रा’ या नौदलाच्या हेलिकॉप्टर तळावरून उड्डाण घेत ही आपत्कालीन वैद
.
भारतीय तटरक्षक दलाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर या मोहिमेची माहिती दिली आहे. ‘एमटी देश शक्ती’ या भारतीय मालवाहू जहाजावरील एका ३० वर्षीय खलाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने उपचारांची गरज असल्याने, मेरीटाइम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर आणि भारतीय नौदलाने अत्यंत वेगाने आणि अचूक समन्वय साधत ही बचाव मोहीम हाती घेतली.
‘रेड अलर्ट’च्या सावटाखाली थरारक उड्डाण
भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडनेही या धाडसी मोहिमेचे तपशील शेअर केले आहेत. सध्या मुंबई व किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सध्या मुंबई आणि किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अशा कठीण परिस्थितीत बचावकार्य करणे हे नौदलासमोर एक मोठे आव्हान होते.

‘रेस्क्यू बास्केट’चा वापर करून वर खेचले
सतत कोसळणारा पाऊस, अत्यंत कमी दृश्यमानता आणि खवळलेला समुद्र अशा जीवघेण्या परिस्थितीत हेलिकॉप्टर उडवणे अत्यंत धोकादायक होते. या सर्व नैसर्गिक संकटांवर मात करत, नौदलाच्या वैमानिकांनी अत्यंत कौशल्याने हेलिकॉप्टर जहाजावर घिरट्या घालत स्थिर ठेवले आणि ‘रेस्क्यू बास्केट’चा वापर करून जखमी खलाशाला सुरक्षितपणे वर खेचून घेतले. खलाशाला हेलिकॉप्टरमध्ये घेतल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याची प्रकृती स्थिर करण्यात आली. त्यानंतर तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी त्याला किनाऱ्यावर आणून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हिंदी महासागरातील ‘फर्स्ट रिस्पॉन्डर’
नौदलाने अत्यंत कठीण परिस्थितीत पार पाडलेल्या या मोहिमेमुळे हिंदी महासागर क्षेत्रात ‘फर्स्ट रिस्पॉन्डर’ म्हणजेच संकटात सर्वात आधी मदतीला धावून जाणारे दल, म्हणून असलेली भारतीय नौदलाची ओळख अधिकच दृढ झाली आहे. तसेच, भर समुद्रात अडकलेल्यांचे प्राण वाचवण्याच्या नौदलाच्या अढळ संकल्पाची आणि कार्यतत्परतेची या घटनेतून पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
हे ही वाचा…
महापौर रितू तावडेंकडून वरळी सी-फेसवर पाहणी:आदित्य ठाकरेंची जोरदार टीका, म्हणाले – ड्रामा थांबवा, मुंबई चालवण्यावर लक्ष द्या

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना महापौर रितू तावडे यांनी वरळी सी-फेस परिसराची पाहणी करून नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या पाहणीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधत ही केवळ ‘ड्रामा’बाजी असल्याची टीका केली आहे. सविस्तर वाचा…
6 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस-वादळाचा धोका:गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मुंबई महानगर प्रदेशात सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा जोर अपेक्षेपेक्षा जास्त असून, येत्या 6 तारखेपर्यंत हे संकट कायम राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सविस्तर बातमी वाचा…
राज्यात आडवातिडवा पाऊस:मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार, कोकणात रेड अलर्ट; विदर्भातही पावसाचा जोर

राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र नागरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीमधील शाळांना प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. सविस्तर वाचा