![]()
नकली नोटा चलनात आणण्यासाठी सोशल मीडियावर विक्रीचे रॅकेट सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले आहे. एक लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात 8 लाख, तर 2 लाखांच्या बदल्यात 20 लाखांच्या नकली नोटांची अक्षरश: खुलेआम विक्री केली जात आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार अन् हैदराबातेतून हे रॅकेट चालवले जाते. हैदराबाद अन् नंदुरबारच्या दलालांशी संपर्क साधून ‘दिव्य मराठी’ने या बनावट नोटांचा सौदा केला होता. हैदराबादच्या दलालाने तर कुरियरने 10 हजारांच्या बदल्यात 30 हजारांच्या बनावट नोटाही रिपोर्टरला पाठवण्याची तयारी दर्शवली होती. नंदुरबार येथे थेट नोटा घेण्यासाठीच बोलावले होते. हैदराबादेतील दलालाकडून सुरत, धुळे, मुंबई, कोलकाता, दिल्लीसह इतर राज्यांत बनावट नोटांचे रॅकेट चालते.दलाल ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला कुरियरने 30 हजारांच्या नोटा पाठवण्यास तयार झाला. दोघे अडकले ‘दिव्य मराठी’च्या स्टिंगमध्ये हैदराबाद : कुरियरने पाठवतो
रिपोर्टर : कर्ज फेडायला नोटा हव्यात.
दलाल : माझ्या नोटा फक्त बाजारात वापरायच्या. सीडीएम, बँकेत नाही.
रिपोर्टर : काय किंमत आहे नोटांची?
दलाल : एक खऱ्या नोटेवर 3 मिळतील कमीत कमी 10 हजार रुपये लागतील.
रिपोर्टर : प्रत्यक्ष द्याल की कुरियरने.
दलाल : कुरियरने पाठवतो, पण डिलिव्हरीपूर्वी ऑनलाइन पैसे द्यावे लागतील. नंदुरबार : आम्ही गॅरंटी घेतो
रिपोर्टर : मला बनावट नोटा हव्या.
दलाल : मिळेल, सीडीएममध्येही टाकू शकाल अशा नोटा देतो.
रिपोर्टर : कुरियरने पाठवता का?
दलाल : नाही, नंदुरबारला या.
रिपोर्टर : ट्रॅप होण्याची भीती वाटते.
दलाल : अजिबात घाबरू नका. प्रतिनिधी : नोटा हुबेहूब आहेत का?
दलाल : ओरिजनलप्रमाणे नोटा आहेत. 6 महिने रंग जाणार नाही.
1 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘नकली नोट चेंज’ नावाने 10 पेक्षा अधिक ग्रुप सक्रिय आहेत. शिवाय ‘786 का नोट’ ‘पार्थ एक्स्चेंज-12’, ‘साई वसावे’ ‘नकली नोटवाला’ आदी शीर्षकांचे ग्रुपही कार्यरत आहेत. 2 गरजवंत ग्रुपवर मेसेज करून नोटांची ऑर्डर देतात. दलाल व्हर्च्युअल कॉलवरून व्यवहाराचे ठिकाण ठरवतात. तिथे नोटांची खरेदी-विक्री होते. महाराष्ट्रात पोलिस दरमहा 3 ते 4 कारवाई करतात. नोटा तपासण्याची सोय नसल्याने मार्केट, भाजी मंडई, फ्युल पंपावर चलनात आणले जाते. एनसीआरबी-2024 च्या अहवालानुसार महाराष्ट्रात 6 वर्षांत 1.11 कोटींच्या 33,539 तर देशात 54.6 कोटींच्या 8.21 लाखांच्या नोटा जप्त केल्यात. 2020 ते 2025 दरम्यान 273 गुन्हे दाखल आहेत. 566 आरोपींना अटक झाली. जानेवारी-2016 मध्ये गडचरिोली, ठाणे, मालेगावात 1.72 कोटींच्या नोटा पकडल्या.
Source link
नंदुरबारमधून चालते बनावट नोटांचे रॅकेट:एक लाखात मिळते आठ लाखांचे चलन, हैदराबाद, सुरतहून देशभरात सक्रिय माफियांचे जाळे