Headlines

सराफा दुकानातून दीड तोळ्याची ‎सोन्याची अंगठी घेऊन भामटा फरार‎:गंगापुरात संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद‎




गंगापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या राजीव गांधी चौक परिसरातील ‘महेंद्र ज्वेलर्स’ या सराफा दुकानातून एका अज्ञात भामट्याने भरदिवसा चलाखीने सोन्याची अंगठी लांबवल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी (27 जुलै) दुपारी दोनच्या सुमारास ही चोरी झाली. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, घटनेनंतर काही तासांतच संशयित आरोपीला नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी ग्राहक असल्याचे भासवत महेंद्र ज्वेलर्समध्ये शिरला. त्याने दुकानातील कारागीर देवेंद्र सुवर्णकार यांच्याकडे सोन्याची अंगठी पाहण्याची इच्छा व्यक्त केली. दुकानदाराने त्याला सुमारे दीड तोळ्याची सोन्याची अंगठी दाखवली. भामट्याने अंगठी हातात घेतली आणि बोटात घालून पाहण्याचा बहाणा केला. काही क्षणातच कोणाला काही समजण्याच्या आत त्याने दुकानातून बाहेर पळ काढला. बाईकवरून पसार दुकानदाराने आणि कारागिराने तत्काळ त्याच्या मागे धाव घेत पाठलाग सुरू केला. मात्र, आरोपी जुन्या बसस्थानक परिसरातून धावत पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात शिरला. तेथे आधीपासूनच उभ्या असलेल्या एका मोटारसायकलवर बसून त्याने भरधाव वेगाने पोबारा केला. त्यामुळे कारागिराचा पाठलाग निष्फळ ठरला. सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित ताब्यात या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा पोलिसांनी सायंकाळी एका संशयिताला ताब्यात घेतले आणि गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. शेख असीम सादिक (रा. प्रवरासंगम) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *