राज्यात पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शरद पवार येत्या 28 सप्टेंबरपासून राज्याच्या दुष
.
दुसरीकडे, पक्षाचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी सुरू केली असून, सरकारने तत्काळ मदत न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला आहे.
शरद पवार जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर
अनेक जिल्ह्यांत अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना उभ्या पिकांवर नांगर फिरवावा लागला आहे. राज्य सरकारने ५ ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे जाहीर केले असले तरी, ‘मदत कधी मिळणार?’ या विवंचनेत शेतकरी आहे. याच पार्श्वभूमीवर, देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार २८ सप्टेंबरपासून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसणार आहेत. यापूर्वीच त्यांनी सरकारला पत्र लिहून राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदतीसह एकूण ९ मागण्या केल्या होत्या. आता त्यांच्या या प्रत्यक्ष दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
रोहित पवारांनी मांडली दुष्काळाची दाहकता
एकीकडे शरद पवारांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू असताना, दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी कालपासूनच दुष्काळी भागाची पाहणी सुरू केली आहे. धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील विदारक परिस्थिती जवळून पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले आहे. “पावसाअभावी संपूर्ण खरीप हंगाम वाया गेलाय. शेतकऱ्यांशी चर्चा करताना त्यांच्या डोळ्यांत दिसणारी हतबलता काळीज चिरणारी आहे,” अशा शब्दांत त्यांनी दुष्काळाची भीषणता मांडली.
पिण्याचे पाणी, चारा अन् फळबागांचा प्रश्न गंभीर
परतीच्या पावसाची आशाही धूसर झाल्याने शेतकरी पूर्णपणे खचला आहे. “पिण्याच्या पाण्याचं काय, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा कशा जगवायच्या आणि मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याचं काय करायचं, या विवंचनेत शेतकरी आहे. ही भीषण अवस्था पाहूनही सरकार अजून शांत कसं बसू शकतं?” असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
‘तत्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू’
दुष्काळाच्या या संकटात सरकारने राजकारण बाजूला ठेवून युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. “सरकारने एक क्षणही वाया न घालवता शेतकरी आणि शेतमजुरांना भरीव मदत देण्याबाबत काम सुरू करावे. विरोधी पक्ष म्हणून आमची सरकारला सहकार्याचीच भूमिका राहील, पण सरकार निष्क्रिय राहणार असेल तर त्याला जागं करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल,” असा इशाराही रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे.
हेही वाचा..
सत्ताधाऱ्यांचा अहंकाराचा माज उतरवण्याची वेळ आलीय:दुष्काळ आणि MPSC च्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान, पीक विम्याचा गोंधळ आणि रखडलेली नोकरभरती यांसारख्या विविध ज्वलंत प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. मराठवाडा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या ‘काजू-बदाम’ खाण्याच्या वक्तव्याचा समाचार घेत, सत्ताधाऱ्यांचा ‘अहंकाराचा माज’ उतरवण्याची वेळ आल्याचा घणाघात केला. तसेच, २४ तारखेला बीडमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि २६ तारखेला पुण्यात MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठ्या आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे. सविस्तर वाचा