![]()
मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवरून जात असताना भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्याला अपघात झाला आहे. त्यांच्या ताफ्यातील एका कारची आणि टॅक्सीची धडक होऊन हा अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवीण दरेकर पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या मुंबईमध्ये गणेशोत्सवाचे शेवटचे काही दिवस उरल्याने सर्वत्र मोठी लगबग पाहायला मिळत आहे. गणेश दर्शनासाठी भाविकांची रस्त्यांवर मोठी गर्दी असून टॅक्सी आणि खाजगी वाहनांचा वापर वाढल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे. अशातच अनेक राजकीय नेते, आमदार आणि मंत्री गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी फिरत असताना दरेकरांच्या ताफ्यासोबत ही अपघाताची घटना घडली. या अपघाताची तीव्रता फारशी नसल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, या धडकेत दरेकर यांच्या ताफ्यातील कारचे आणि धडकलेल्या टॅक्सीचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघातानंतर प्रवीण दरेकर स्वतः गाडीतून खाली उतरून पाहणी करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे खासगी सुरक्षारक्षकही उपस्थित होते. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ खळबळ उडाली होती, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने वाहतूक सुरळीत केली.
Source link
मुंबईत प्रवीण दरेकरांच्या ताफ्याला अपघात:ईस्टर्न फ्रीवेवर कार आणि टॅक्सीची धडक; अपघातात वाहनांचे किरकोळ नुकसान