Headlines

आदिवासी महिलेच्या कागदपत्रांचा गैरवापर; खात्यात आले 42 लाख:नाशिकमधील प्रकार, सायबर फ्राॅडमधील रक्कम वळवल्याचा संशय




शासकीय योजनेसाठी आधार व पॅन कार्ड दिलेल्या एका आदिवासी गरीब महिलेच्या नावाने बँक खाते उघडून खात्यात तब्बल ४२ लाखांची रक्कम जमा केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २७) देवळाली कॅम्प येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत उघडकीस आला. ही रक्कम सायबर फ्रॉडमधून वळवण्यात आल्याचा संशय असून कोणत्या खात्यांमधून ती जमा झाली, याची यादी मिळवण्यासाठी तांत्रिक मदत घेतली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आदिवासी महिलेची परिस्थिती हलाखीची आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरिता तिने काही दिवसांपूर्वी आधार, पॅन कार्ड आणि फोटो एका केंद्रात जमा केले होते. या कागदपत्रांचा गैरवापर करत महिलेच्या नावाने बँकेत बोगस खाते उघडण्यात आले. देशात विविध ठिकाणी झालेल्या सायबर फ्रॉडची ४२ लाखांची रक्कम खात्यात ऑनलाइन जमा केली. नव्यानेच उघडलेल्या खात्यात अचानक एवढी रक्कम जमा झाल्याने बँक व्यवस्थापनाचे लक्ष या व्यवहाराकडे गेले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *