Headlines

नवले पुलावर मध्यरात्री पुन्हा भीषण अपघात:सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला; एकाचा जागेवरच मृत्यू, दोघे जखमी- VIDEOS




पुण्यातील नवले पुलाजवळ मंगळवारी मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट मिक्सर टँकरवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे टँकर रस्त्यावर पलटी होऊन थेट समोरून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी दोघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर नवले पूल परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पुणे वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त टँकर बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, टँकरचा वेग जास्त होता का, चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले आणि अपघातामागील इतर कारणे कोणती याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. नवले पुलावर वारंवार होणारे अपघात आणि निष्पाप नागरिकांचे बळी यामुळे पुणेकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तळेगाव एमआयडीसीत भीषण दुर्घटना:कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीने दोन कामगारांचा मृत्यू, 3 कामगार गंभीर जखमी मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे येथे असलेल्या शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीची धक्कादायक घटना घडली असून, या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरुवातीला या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्राथमिक तपासाअंती कंपनीमध्ये स्फोट नव्हे, तर कार्बन डायऑक्साइड गॅस गळती झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *