![]()
कुराश या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा न घेताच बोगस क्रीडा प्रमाणपत्रे वाटून शासकीय नोकरीत 5 टक्के क्रीडा आरक्षण मिळवणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, 2018-19 मध्ये वाटलेल्या या प्रमाणपत्रांवर औरंगाबाद आणि उस्मानाबादऐवजी त्यानंतरच्या काळात बदलण्यात आलेली ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ ही नावे वापरल्याने रॅकेटचे बिंग फुटले. याप्रकरणी अटक केलेला राज्य कुराश संघटनेचा अध्यक्ष शिवाजी साळुंखे (46) आणि सचिव अंकुश नागर (40) यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे पोलिस दलात 19 जण भरती झाले. या सर्वांची नियुक्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. 2023 रोजी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. मात्र, आरोपींनी 2018 आणि 2019 च्या प्रमाणपत्रांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नाव छापून आधीच्या तारखेत सह्या केल्याचे आढळून आले. ज्यामुळे त्यांचा बनाव उघडकीस आला व या प्रकरणाचा भंडाफोड झाला. 3 ते 5 लाख रुपयांत कुराश खेळाच्या 1500 प्रमाणपत्रांचे वाटप 2016 पासून राज्यात 1200 ते 1500 जणांना प्रत्येकी 3 ते 5 लाख रुपये घेऊन ही बोगस प्रमाणपत्रे विकल्याचे तपासात स्पष्ट झाले. म्हणजे हा घोटाळा सुमारे 75 कोटींचा असू शकेन. स्पर्धा न घेताच 2016 ते 2023 पर्यंतचे रेकॉर्ड 2024 नंतर नव्याने तयार केले होते. यातून मिळवलेल्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी नोंदणी व मुद्रांक विभाग व आयकर विभागाला पत्र पाठवले. 71 जणांचे प्रमाणपत्र, राज्यातील कुराश संघटना, खेळाडु रडारवर या प्रकरणी क्रीडा संचालनालयाने 71 जणांच्या प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली होती. पुणे, परभणी, धाराशिव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतील कुराश खेळाच्या संघटना व खेळाडू तपासाच्या रडारवर आहेत. रॅकेटची पाळेमुळे देशपातळीवर असू शकतात.
Source link
2023 मध्ये संभाजीनगरचे नामकरण, तरी 2018 च्या क्रीडा प्रमाणपत्रावर नाव:पुण्यात 75 काेटींचा घाेटाळा; दोघांना कोठडी, 19 पोलिस नियुक्त्या धोक्यात