Headlines

नांदेडमध्ये 18 महिन्यात 217 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:175 आत्महत्या पात्र, 12 प्रकरण अपात्र; 30 प्रकरणे अजूनही चौकशीत




जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य संपता संपत नसल्याचे चित्र वारंवार पुढे येत आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या १८ महिन्यात तब्बल २१७ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. यातील केवळ १७५ आत्महत्या शासनाने पात्र ठरवले असून १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. तर चौकशीसाठी 30 प्रकरण प्रलंबित असून आत्तापर्यंत १६४ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. विशेष बाबी की राज्य सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन महिन्यापासून कोणताही निधी वितरित केला नसल्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना साधी एक लाख रुपयाची मदत ही शासनाकडून मिळण्यास विलंब होत असल्याचे चित्र दिसून येते. नांदेड जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते मे २०२६ या १८ महिन्याच्या काळामध्ये २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये १७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. १७० आत्महत्यांपैकी अनुदानासाठी १५७ आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्या तर ११ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या होत्या. दोन प्रकरण चौकशी साठी प्रलंबित होती तर १५५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान राज्य शासनाकडून देण्यात आले आहे. जानेवारी २०२६ मध्ये ११ , फेब्रुवारी २०२६ मध्ये ८, मार्च २०१६ मध्ये १०, एप्रिल २०२६ मध्ये ४, मे २०२६ मध्ये १४ अशा ४७ आत्महत्या २०२६ मध्ये झाल्या आहेत. २१७ आत्महत्यांपैकी १७५ आत्महत्या पात्र ठरवण्यात आल्या. १२ प्रकरण अपात्र ठरविण्यात आले तर 30 प्रकरणाची चौकशी सुरू आहे .१६४ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सामान्यतः खालील निकष विचारात घेतले जातात:
निधी अभावी अनुदान वितरण थांबले एक मार्च २०२६ नंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही. यापूर्वी जो निधी प्राप्त झाला होता, तो निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच निधी प्राप्त झाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात येईल अशी माहिती नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे तहसीलदार विपिन पाटील यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *