Headlines

Ketan Agrawal Murder Case: Employee Becomes Approver Witness



पुण्यातील बहुचर्चित केतन अगरवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाचा दुवा लागला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी चेतन चौधरी याच्या दुकानात काम करणारा कर्मचारी नीरज कुमार आता या खटल्यात ‘माफीचा साक्षीदार’ झा

.

लोहगड किल्ल्याच्या परिसरात घडलेल्या या थरारक हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरोधात पोलिसांकडे आधीच सबळ पुरावे आहेत. मात्र, आता नीरज कुमार याने माफीचा साक्षीदार होण्यास मान्यता दिल्याने या हत्येचा कट, नियोजन आणि आरोपींची घटनास्थळावरील उपस्थिती न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध करणे पोलिसांसाठी अधिक सोपे होणार आहे.

त्यामुळे बनाव उघडा पडला

हत्या घडली त्या दिवशी 18 जून रोजी आरोपी चेतन चौधरी याने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तांत्रिक पुराव्यांशी छेडछाड करण्याचा कट रचला होता. चेतनने स्वतःचा मोबाईल कर्मचारी नीरजकडे ठेवला होता, तर नीरजचा मोबाईल घेऊन तो स्वतः लोहगड परिसरात गेला होता. त्या दिवशी सकाळी सव्वा सात वाजेपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चेतनचा मोबाईल नीरजकडेच होता आणि या काळात चेतनच्या मोबाईलवर आलेले सर्व फोन नीरजनेच स्वीकारले. जेणेकरून चेतनचे लोकेशन पुण्यातच दिसावे, असा यामागचा हेतू होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता नीरजच्या मोबाईलचे लोकेशन लोहगड आणि आसपासच्या परिसरात आढळून आले, ज्यामुळे चेतनचा हा बनाव उघडा पडला.

सिया गोयलची कबुली

दरम्यान, पोलिस कोठडीत असलेल्या सिया गोयल हिने चौकशी दरम्यान अनेक खुलासे केले आहेत. सियाच्या दाव्यानुसार, तिने केतनला तिचे आणि चेतन चौधरीचे प्रेमसंबंध असल्याचे आधीच सांगितले होते. मला हे लग्न करायचे नाही आणि मला पळून जायचे आहे, असे तिने केतनला स्पष्ट केले होते. मात्र, केतन हे लग्न मोडण्यास तयार नव्हता. आता हे लग्न रद्द होऊ शकत नाही. माझे कुटुंब अत्यंत श्रीमंत आणि प्रबळ आहे; तू कुठेही गेलीस तरी तुला शोधून काढू, अशी तंबी केतनने दिली होती, असा दावा सियाने पोलिसांसमोर केला आहे.

केतनशी लग्न करण्यासाठी माझ्यावर कुटुंबाचा प्रचंड दबाव होता, अशी कबुली सियाने दिली. केतनची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली, संपन्न आणि प्रतिष्ठित असल्याने त्याच्याशी लग्न केल्यास सियाचे भविष्य सुरक्षित होईल, असे तिच्या घरच्यांना वाटत होते. याउलट, चेतनची आर्थिक स्थिती बेताची असल्याने सियाचे कुटुंबीय त्यांच्या नात्याच्या पूर्णपणे विरोधात होते.

चेतनने स्वतःचा फोन दुकानात ठेवला होता

चेतनचे वडील बाबूलाल चौधरींनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, सियासोबत आमचे कधीही भेटणे झाले नव्हते. तिला कधी पाहिलेदेखील नव्हते किंवा तिचे नावही ऐकले नव्हते. या घटनेनंतर तिला पहिल्यांदाच पोलिस चौकीत पाहिले. चेतन आणि ती संपर्कात असल्यास त्याबाबत कल्पना नाही. माझ्या मुलास या घटनेत फसवले जात आहे. अटकेनंतर मी त्याला भेटलो. तेव्हा त्याने मला रडत रडत सांगितले की, त्या दि‌वशी मी संबंधित ठिकाणी नव्हतो. तर दूर उभा होतो. मला फसवले जात आहे. चेतन लोहगडावर कशासाठी गेला याबाबतची कोणती माहिती त्याने कुटुंबाला दिली नव्हती. त्या दिवशी घरातून तो लवकर गेला आणि जाताना त्याने आईला सांगितले की, वडिलांना आज लवकर दुकानात पाठव. चेतन घरातून बाहेर पडल्यानंतर दुकानात गेला होता. त्याने दुकानातील एका कामगाराचा फोन स्वतःकडे घेऊन स्वतःचा फोन दुकानात ठेवला होता. कामानिमित्ताने मी बाहेर जात असून दुपारपर्यंत परत येईन असे त्याने सांगितले होते. मागील तीन वर्षांपासून चेतन व्यवसायात लक्ष घालत होता. त्याने आतापर्यंत विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये शंभर ते दीडशे ट्रॉफी मिळवल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वृत्त वाचा

केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाच केतनच्या जवळ उभी होती, मी तर दूर उभा होतो- चेतन चौधरी, चेतनने केतन अग्रवालच्या खुनाचा तपशील सांगितला

पुण्यातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतनचा त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून खून केल्याचे पोलिस तपासात दिसून आले. या दोघांना न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अटकेनंतर सियाचा प्रियकर चेतनने रडत रडत स्वत:चे वडील बाबूलाल चौधरी यांना सांगितले की, घटना घडली तेव्हा सिया केतनजवळ उभी होती, मी तर दूर उभा होतो. पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यात सिया व चेतनमध्ये २००४ कॉल झाले होते. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.