![]()
नागपुरात पकडलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या तपासातून दादरा आणि नगर हवेलीतील एका कारखान्याचा पर्दाफाश झाला. नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘मार्मिक इंडस्ट्रीज’वर छापा टाकत ६.२६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ८ डिसेंबर २०२५ रोजी कळमेश्वरमधील गोंडखैरी येथील व्हीआरएल लॉजिस्टिक यार्डमध्ये एका कंटेनरमधून १४.४० लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त झाला होता. त्यावेळी कंटेनरचालक छविनाथ मोहन निषाद (३०, रा. उत्तर प्रदेश) याला अटक झाली होती. या तपासातून दादरा आणि नगर हवेलीतील डेमीनी रोडवरील ‘मार्मिक इंडस्ट्रीज’चा पत्ता लागला. कारखान्यात ८८ हजारांहून अधिक नायलॉन मांजाच्या चक्र्या (५.०९ कोटी रुपये), ९५ लाख रुपयांची यंत्रसामग्री, कच्चा माल आणि पॅकिंग साहित्य जप्त झाले. ‘गोल्ड’, ‘शक्ती’, ‘कोब्रा’ यांसारख्या विविध ब्रँडच्या नावाने हा मांजा तयार होत होता. कारखान्याचा मालक आणि वितरणाचे जाळे याचा तपास अजून सुरू आहे.
Source link
नागपुरात पकडलेल्या मांजाचे धागेदोरे दादरा-नगर हवेलीतील कारखान्यापर्यंत:6.26 कोटींचा माल जप्त