![]()
जीवनात अनुकूल परिस्थिती असो वा प्रतिकूल, नामस्मरण निरंतर सुरू ठेवले पाहिजे. नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासा बुद्रुक येथील ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महारा
.
हरीकथा, नामघोष आणि नामस्मरणातून मानवी जीवाला समाधान मिळते. मात्र त्यासाठी मनाची निरंतरता आवश्यक आहे. संसाराच्या तापाने थकलेल्या मनाला ग्रंथ, मठ, मंदिर आणि तीर्थक्षेत्रांतून नवचैतन्य प्राप्त होते. आपण सर्वजण ईश्वरस्वरूप आहोत. मायेचा अडसर दूर झाला की भगवंताची प्राप्ती होते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी आणि संन्यासी यांच्या तपश्चर्येची तुलना करताना त्यांनी म्हटले की, दोघांचेही पुण्य समान आहे. शेतकरीही शेतीत तप करतो, तेव्हाच उत्पादन मिळते. मात्र त्याच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्याची अवस्था बिकट झाली आहे.
सद्गुरु आश्रमाचा सप्ताह उत्सव सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडल्याचे सांगत त्यांनी पंचक्रोशीतील गावांनी दिलेल्या भाकरी प्रसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठांचे नियोजन आणि तरुणांचे श्रम यामुळे उत्सव निर्विघ्न पार पडला, असेही ते म्हणाले. पुढील वर्षी आश्रमाचा तपपूर्ती सोहळा होणार असून, सर्वांनी सहभागी होऊन हा उत्सव आदर्शवत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कीर्तनानंतर विविध प्रकारची सेवा देणाऱ्या दात्यांचा सन्मान करण्यात आला. आश्रमाचे शिक्षक बाळासाहेब झिने यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी राज्यभरातील मान्यवर कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, भजनी मंडळी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजचे संतपूजन नामदेव रावसाहेब शिंदे, सीताराम गारुळे, भाऊसाहेब तऱ्हाळ, श्रध्दा आढाव यांच्यावतीने तर काला महाप्रसाद नामदेव पाटील शिंदे व परिवार यांच्यावतीने देण्यात आला.
हरिकथा अन् नामस्मरणातून मनाला समाधान हरीकथा, नामघोष आणि नामस्मरणातून मानवी जीवाला समाधान मिळते. मात्र त्यासाठी मनाची निरंतरता आवश्यक आहे. संसाराच्या तापाने थकलेल्या मनाला ग्रंथ, मठ, मंदिर आणि तीर्थक्षेत्रांतून नवचैतन्य प्राप्त होते असे हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले.