Headlines

न्यू आझाद गणेश मंडळ वर्षभर पुरवते सेवा:रक्तदान, रुग्णसेवा, आपत्तीग्रस्तांना भोजन-निवास अन् महिला सुरक्षेसाठी मदत पथक




नगरसेवक दिनेश बूब यांच्या नावाने ओळखले जाणारे न्यू आझाद गणेश मंडळ वर्षभर सेवाकार्य करते. रुग्णसेवा, रक्तदान, आपत्तीग्रस्तांना भोजन-निवास, हताश-निराश झालेल्यांचे समुपदेशन आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मदत पथक अशी या मंडळाची सेवा आहे. त्यामुळे या मंडळाचा गणेशोत्सव अमरावतीकरांना भक्तीचा आनंद देणारा असतो. न्यू आझाद गणेश मंडळातील श्रींची मूर्ती दरवर्षी जागेवरच बनवली जाते. त्यामुळे आगमन मिरवणूक नसते. मात्र या मंडळाची विसर्जन मिरवणूक अमरावतीच नव्हे, तर पंचक्रोशीतील गणेशभक्तांसाठी उत्सुकतेचा विषय असते. विसर्जन पथ केळीचे खांब, फुले आणि रांगोळ्यांनी सजवले जाते. या मिरवणुकीत दिंड्या, ताशे, ढोल पथके, लेझीम पथके आणि पारंपरिक वाद्यांची रेलचेल असते. अनेक मंडळे स्वतःहून या मिरवणुकीत सहभागी होऊन सेवा देतात. या मंडळात लहान-मोठा, व्हीआयपी-साधा असा कोणताही भेद पाळला जात नाही. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी येणारी प्रत्येक व्यक्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसाठी ‘व्हीव्हीआयपी’ असते. उत्कृष्ट देखावा आणि शिस्तबद्ध दर्शन ही या मंडळाची आणखी एक ओळख आहे. गणेशोत्सवाच्या काळात येथे केवळ भक्तीचा जागर केला जातो. न्यू आझाद मंडळाचा हा ४९ वा गणेशोत्सव आहे. डीजे, फटाके आणि गुलालाला येथे कायम बंदी असते. मराठमोळी संस्कृती जपण्यासाठी फटाके उडवणे किंवा गुलालाची उधळण करणे कटाक्षाने टाळले जाते. विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रमुख चौकांमध्ये मान्यवरांच्या हस्ते महाआरती केली जाते. न्यू आझाद हिंद मंडळाची गणेशमूर्ती पारंपरिक गणेशोत्सवापेक्षा एक आठवडा अधिक कालावधीसाठी प्रतिष्ठापित केली जाते. त्यामुळे विसर्जन मिरवणूकही सर्व मंडळांच्या विसर्जनानंतरच आयोजित केली जाते. यावर्षी ही मिरवणूक गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी काढली जाईल. हे मंडळ इतर कोणत्याही मंडळाशी स्पर्धा करत नाही. गणपतीची आरास, देखावा, सजावट आणि विसर्जन मिरवणुकीत पूर्णतः पारंपरिक व पर्यावरणपूरक बाज राखला जातो. तरीही हे मंडळ शासन किंवा एनजीओमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धांपासून स्वतःला नेहमी दूर ठेवते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *