![]()
नवी मुंबईच्या कळंबोलीत 2006 मध्ये भरदिवसा झालेल्या पवनराजे निंबाळकर यांच्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेला आज दोन दशके पूर्ण झाल्यानंतर, मुंबई सत्र न्यायालय या प्रकरणाचा अंतिम निकाल सुनावणार आहे. 16 जून रोजीच हा निकाल येणार होता, मात्र न्यायालयाने पुढील तारीख दिल्याने आज, 20 जून रोजी या खटल्याचा अंतिम फैसला होणार आहे. “20 वर्षे यातना सोसल्या…”
आज निकालाची तारीख असल्याने दिवंगत पवनराजेंचे चिरंजीव आणि खासदार ओमराजे निंबाळकर न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना ते भावुक झाले आणि म्हणाले, “गेल्या 20 वर्षांपासून आमच्या कुटुंबाने प्रचंड यातना सोसल्या आहेत. आता न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, या निकालाच्या पार्श्वभूमीवर ओमराजे यांच्या धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथील घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर 24 तास पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काय आहे 25 लाखांच्या सुपारीचे प्रकरण?
3 जून 2006 रोजी राजकीय वैमनस्यातून पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सीबीआयच्या तपासानुसार, राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांनी 25 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली होती. या खटल्यात पद्मसिंह पाटील यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह 9 जण आरोपी आहेत. आजच्या या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले असून, या निकालानंतरच ओमराजे निंबाळकर आपली पुढील राजकीय दिशा ठरवणार आहेत. हे ही वाचा.. दिव्य मराठी एक्सक्लूझिव्ह: रश्मी ठाकरे, संजय राऊतांमुळे ठाकरे गट फुटला का?:शिंदेंच्या एका कॉलमुळे 6 MP बंडखोर; पुढील लक्ष्य 3 MLC, 65 नगरसेवक उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. 9 पैकी फक्त 4 खासदार पोहोचले. तेव्हाच पक्षात मोठी फूट पडणार हे निश्चित झाले. 16 जून रोजी 6 खासदार दिल्लीला पोहोचले आणि 17 जून रोजी लोकसभा अध्यक्षांना भेटले. त्याच दिवशी बातम्या आल्या की, संजय दीना पाटील आणि ओमप्रकाश निंबाळकर हे दोन खासदार 18 जून रोजी पुन्हा शिवसेना (उद्धव गट) च्या संसदीय बैठकीत जाऊ शकतात, परंतु सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झूम कॉन्फरन्स कॉलवर सर्व खासदारांशी संवाद साधला आणि ते शिवसेना (शिंदे गट) मध्ये विलीन होण्यास तयार झाले. सविस्तर वाचा
Source link
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज अंतिम फैसला:पक्षांतराच्या चर्चेमुळे ओमराजेंच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त