Headlines

पहिल्याच पावसात शासनाच्या गोदामातील हरभरा भिजला:अशा दुर्घटना होतच असतात, व्यवस्थापकिय संचालकांची संतप्त प्रतिक्रिया




हिंगोली शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामावरील पत्रे उडाल्याने सुमारे ४ हजार मेट्रीक टन हरभरा पिक भिजल्याचे चित्र आहे. यातून शासनाने तब्बल २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदोष गोदाम भाडेतत्वावर घेतल्याने हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे वखार महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक कैस्तूभ दिवेगावकर यांनी अशा घटना घडतच असतात अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे शेतकरी व नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. हिंगोली शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने गोदाम भाडेतत्वावर घेतले आङे. या ठिकाणी नाफेडद्वारे खरेदी केलेला सुमारे ४ हजार मेट्रीक टन हरभरा ठेवण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी भाडेतत्वावर घेतलेले गोदाम सदोष असून कुठल्याही प्रकारचे निकष पाळण्यात आलेले नाहीत. हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमधील गोदामाची हिच स्थिती होती. त्यामुळे शनिवारी ता. १३ झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे गोदामावरील टीनपत्रे उडून गेली आहेत. दरम्यान, गोदामावरील टीनपत्रे उडून गेल्यामुळे त्यात ठेवण्यात आलेल्या हरभऱ्याच्या पोत्यात पाणी गेल्याने हरभरा भिजून केला आहे. यामध्ये सुमारे २० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारानंतर आज वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक निलेश लांडे यांच्या पथकाने तातडीने भेट देऊन पाहणी केली. यावेळी वखार महामंडळाचे सचिन जाधव, नामदार यांच्या पथकाने रविवारी ता. १४ गोदामाला भेट दिली आहे. या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम केले जात आहे. सदर गोदाम भाडेतत्वावर घेतांन कोणतेही निकष पाळण्यात आलेले नसल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी व नागरीकांतून केला जात आहे. गोदाम भाडेतत्वावर घेतांना हे आहेत निकष गोदाम भाडेतत्वावर घेतांना गोदामाचे उंची योग्य असावी. गोदामात हवा खेळती असावी, विज पुरवठा व्यवस्थित असावा. अग्नीरोधक यंत्रे उपलब्ध असावेत. सुरक्षा कर्मचारी उपलब्ध असावेत. सर्वेक्षणाच्या कामाला प्राधान्य – निलेश लांडे, विभागीय व्यवस्थापक हिंगोलीच्या गोदामावरील पत्रे उडल्याने काही हरभरा भिजला आहे. मात्र नेमके किती नुकसान झाले याचा अद्याप अंदाज नाही. सर्वेक्षणाच्या कामाला आमचे प्राधान्य आहे. अशा दुर्घटना होतच असतात – कौस्तुक दिवेगावकर, व्यवस्थापकिय संचालक पुणे वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामावरीलपत्रे उडल्याने नाफेड हमीभाव अंतर्गत खरेदी केलेला हरभरासाठा भिजल्याने नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी वखार महामंडळाने राज्यभरातील साठ्याचा विमा उतरविला आहे. मात्र अशा दुर्घटना होतच असतात, आम्ही आज कार्यालय सुरु ठेऊन बसलो आहोत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *