Headlines

पुण्यातील 146 वर्षांची परंपरा आता नाशिकमध्ये!:'रांका ज्वेलर्स' अन् 'जरदोजी' प्रदर्शनाचा नाशिककरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद




पुण्यातील प्रसिद्ध आणि 146 वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली सुवर्णपेढी ‘रांका ज्वेलर्स’ आणि आधुनिक पोषाखांचे अग्रगण्य दालन ‘जरदोजी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रीमियम शोकेस’ सुवर्णालंकार व पोषाख प्रदर्शनाचा रविवार, 9 August 2026 रोजी नाशिक येथील हॉटेल ‘ट्रीट’ येथे भव्य शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी नाशिककरांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला. हे खास प्रदर्शन 10 August 2026 पर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे. प्रमुख उपस्थिती प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, रेश्माताई हिरे, स्वातीताई भांबुरे, संगीताताई सांकला, नंदकिशोर सांकला, आशाताई कटारिया, संगिता सांकला, सिद्धता भन्साळी, अपूर्वा गोयल, साक्षी अग्रवाल तसेच रांका ज्वेलर्सच्या संचालिका शीतल रांका आणि जरदोजीचे श्री. अर्चित अगरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. दागिन्यांमध्ये पारंपरिक अन् आधुनिकतेचा ‘जरा हटके’ संगम प्रदर्शनाबद्दल माहिती देताना रांका ज्वेलर्सच्या संचालिका शीतल रांका यांनी सांगितले की, “येत्या सण-उत्सव आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी खास आणि नावीन्यपूर्ण डिझाईन्स आणल्या आहेत.” प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये: ‘जरदोजी’चा 45 वर्षांचा शाही वारसा नरेश अगरवाल यांनी पुण्यात सुरू केलेल्या ‘अगरवाल टेक्सटाईल्स’पासून या परंपरेची सुरुवात झाली. गेल्या 45 वर्षांचा वारसा जपणारा आणि ‘द फायनेस्ट सिल्क स्टोअर’ म्हणून ओळखला जाणारा ‘जरदोजी’ हा ब्रँड आता श्री. अंकित अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली नवी उंची गाठत आहे. वस्त्रांचे मुख्य आकर्षण: पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक फॅशनचा संगम साधत भारतासह परदेशातही महिलांचा विश्वास जिंकणारा हा ब्रँड नाशिकमध्ये पहिल्यांदाच एकत्र आल्याने खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हे प्रदर्शन सोमवार, 10 August 2026 पर्यंत सुरू राहणार असल्याने नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *