Headlines

'भारताला थांबवण्याची ताकद तुमच्यात नाही!':तिरंगा रॅलीतून CM देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना थेट इशारा; देशभक्तीपर गीतही गायले




स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात विविध ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात असून, याच अनुषंगाने आज मुंबईतही भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना जोरदार भाषण केले आणि एक देशभक्तीपर गीतही गायले. याप्रसंगी आपले विचार मांडताना ते म्हणाले की, भारताला आता कुणीही थांबवू शकत नाही. पण हेही खरंय की काही शक्ती भारताला थांबवायचा प्रयत्न करत आहेत, काही परकीय शक्तीही प्रयत्न करत आहेत की भारताची घौडदौड थांबली पाहिजे. कारण, त्यांना भीती वाटतेय की भारताची घोडदौड अशीच सुरू राहिली, तर जगातील सर्वात महासत्ता असलेला देश भारत होईल. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला आज खरं म्हणजे दोन सागर दिसतात, एक हिंद महासागर समोर दिसतोय आणि दुसरीकडे तिरंगा महासागर पाहायला मिळतो. जोपर्यत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत तिरंगा आता खाली येणार नाही. भारत जगातील 4 थी आर्थिक महासत्ता बनला आहे, सध्या आयटी, AI मध्ये जगात सगळ्यांशी मुकाबला भारत देश करतो. सर्वाधिक युवा असलेला देश भारत बनला आहे. पण, काही परकीय शक्ती भारताला थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना भीती आहे की भारत जगात महासत्ता होईल. भारताला थांबविण्याची ताकद तुमच्यात नाही पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताच्या अंतर्गत मामल्यामध्ये काही ना काही लुडबूड करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मी त्यांनाही सांगू इच्छितो की, ही तिरंगा हाती घेऊन बाहेर पडलेली तरुणाई आहे, यांना थांबवण्याची ताकद तुमच्यात नाही. भारताला थांबविण्याची ताकद तुमच्यात नाही, भारत हा पुढे जात राहणारच, आता 2 दशक बाकी आहेत 2047 ला विकसित भारत जगात आपल्याला पाहायला मिळेल. भारतविरोधी शक्तींना ‘भारत छोडो’ म्हणायची वेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना एकत्र येऊन देशहितासाठी काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, आपल्याला एकच दृष्टिकोन मंत्र घ्यावा लागेल, आपल्याला एकत्रित चालावं लागेल, तिरंगा घेऊन सोबत जावं लागेल. मरते दम तक साथ चलेंगे, नवभारतची संकल्पना मोदी यांनी मांडली. आता ही जबाबदारी तुमची आहे, ही जबाबदारी पार पाडू.” तसेच, 9 ऑगस्ट 1942 ची क्रांती ही ‘भारत छोडो’ची होती, मात्र आजची क्रांती ही ‘करो या मरो’ची आणि ‘विकसित भारत’ची असून आता भारतविरोधी शक्तींना ‘भारत छोडो’ म्हणण्याची वेळ आली आहे, असा स्पष्ट निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ही देखील बातमी वाचा विरोधक भेटले म्हणजे वेगळा अर्थ काढू नये:शरद पवार गटाच्या खासदारांच्या मोदी भेटीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, एफसीआरए कोणत्याही एका धर्माविरोधात नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी भेटायला जाण्यामध्ये काहीही गैर किंवा वावगे नाही. मलाही मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षाचे अनेक नेते भेटत असतात आणि कामे सांगत असतात; त्यामुळे या भेटींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची अजिबात गरज नाही, असे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. इथे वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *