Headlines

Harihar Fort Tourists Attacked in Nashik; Case Filed Against 10


नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. प्रसिद्ध हरिहर किल्ला (Harihar Fort) पाहून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना अडवून मारहाण आणि वाहनावर दगडफेक करण्यात आल्याची संतापजनक घटना घ

.

नेमकी कशी घडली घटना?

पर्यटक हरिहर किल्ल्याला भेट देऊन आपल्या वाहनाने परतत होते. बोरीची वाडी परिसरात त्यांची गाडी जात असताना एका मोटारसायकलला त्यांच्या गाडीचा ‘कट’ लागला. याच क्षुल्लक कारणावरून मोटारसायकलस्वार आणि पर्यटकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढल्याने संबंधितांनी मोटारसायकलवरून पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला.

गाडी अडवून लाठ्या-काठ्यांनी मारहाण आणि दगडफेक

काही अंतर पाठलाग केल्यानंतर वावी हर्ष परिसरात या टोळक्याने पर्यटकांची गाडी अडवली. त्यानंतर चालक आणि प्रवाशांना गाडीतून खाली ओढून त्यांना शिवीगाळ करत काठी आणि चापटीने अमानुष मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पर्यटकांच्या वाहनावर जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीची समोरील काच आणि साईड मिरर फुटले. तसेच, लाठ्या-काठ्या आणि दगडांनी गाडीचे छत आणि बंपरही फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. हल्लेखोरांनी पर्यटकांना जिवे मारण्याची धमकीही दिली.

चार आरोपींना तासाभरात अटक

या घटनेमुळे भयभीत झालेल्या पर्यटकांनी घोटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आणि तातडीने तपासाची चक्रे फिरवली. कारवाईचा वेग वाढवत पोलिसांनी अवघ्या तासाभरात 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित 6 आरोपींचा सध्या कसून शोध घेतला जात आहे.

पर्यटन मार्गांवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, हरिहर किल्ला आणि इगतपुरी-घोटी परिसरात राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, मोटारसायकलला कट लागल्यासारख्या किरकोळ कारणावरून थेट पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करून हल्ला करण्याच्या प्रवृत्तीमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पर्यटन मार्गांवर पोलिसांची गस्त वाढवावी आणि पर्यटकांना सुरक्षितता द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा

शिंदे-फडणवीसांच्या राजकीय वादात मराठा समाजाचा बळी जातोय: सरकारकडून वारंवार फसवणूक, सुषमा अंधारे यांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या मोठे राजकीय वातावरण तापले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “सध्याचे महायुती सरकार मराठा समाजाला केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून त्यांची वारंवार फसवणूक करत आहे,” असा हल्लाबोल अंधारे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय शह-काटशहाच्या खेळात सर्वसामान्य मराठा समाजाला बळीचा बकरा बनवले जात असल्याचे त्या म्हणाल्या. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.