Headlines

मनोज जरांगेंना सरकारचा बदनाम करण्याचा प्रयत्न:आजवर देवेंद्र फडणवीस जरांगेंना का नाही भेटले? भास्कर जाधव यांचा सवाल




राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला असून, आरक्षणाच्या प्रश्नावर आता आरपारची लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. तसेच राज्य सरकार मनोज जरांगे यांना बदनाम करण्याचे काम करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नेत्यांना पुढे करून जरांगे यांना केवळ शब्द दिला जातो. सर्वच पक्षांचे नेते जरांगे पाटील यांना जाऊन भेटले, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजवर त्यांची एकदाही भेट का घेतली नाही? असा थेट सवाल जाधव यांनी उपस्थित करत सरकारच्या हेतूवर शंका व्यक्त केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बढतीवरून फडणवीसांवर निशाणा आंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान ज्या पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार आणि लाठीचार्जचे आदेश दिले, त्या अधिकाऱ्याला राज्य सरकारने बढती दिल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली. तसेच, शंभूराज देसाई यांच्यावर ज्याने हल्ला केला त्यालाही बढती देण्यात आल्याचा दावा करत, भास्कर जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. कुणबी नोंदी रद्द करण्यावरून मनोज जरांगे आक्रमक मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांपैकी काहींचे जात प्रमाणपत्र शासनाने रद्द केल्याच्या प्रकारावरून मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला धारेवर धरले आहे. दिलेल्या नोंदी रद्द करणे ही आमची चूक होती, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचेही कबूल करावे, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यामार्फत झालेली चूक सुधारण्याची तयारी दर्शवली, तशीच भूमिका फडणवीस का घेत नाहीत? त्यांना संपूर्ण समाजाचा रोष अंगावर ओढवून घ्यायचा आहे का? असा सवालही जरांगे यांनी विचारला आहे. परभणी घटनेप्रकरणी सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करा आरक्षणाच्या मुद्द्याव्यतिरिक्त परभणी येथील एका दुर्दैवी घटनेवरूनही भास्कर जाधव यांनी सरकारवर सडकून टीका केली. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला वारंवार फोन करूनही ती वेळेवर उपलब्ध न झाल्याने एका मातेचा आणि तिच्या बाळाचा तडफडून मृत्यू झाला. या धक्कादायक हलगर्जीपणाला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असून, याप्रकरणी सरकारवर कलम 302 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी जोरदार मागणी जाधव यांनी केली. महाराष्ट्र सध्या अत्यंत निष्काळजी लोकांच्या आणि प्रशासनाच्या हातात असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा सोलापुरात लक्ष्मण हाके यांचे मनोज जरांगेंवर टीकास्त्र:म्हणाले- चार कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाली तर थयथय नाचतायत, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरू मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सोलापुरातून जोरदार पलटवार केला आहे. राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा करत हाके यांनी सरकारसह ओबीसी नेत्यांनाही लक्ष्य केले. “कुणबीची चार प्रमाणपत्रे रद्द झाली तर जरांगे थयथय नाचत आहेत. मग ओबीसींच्या आरक्षणाचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. सोलापूर दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी सोलापुरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. इथे सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *