Headlines

नागपुरात पत्नीच्या प्रियकरावर चाकूने हल्ला:भरदिवसा घडली घटना, पतीला अटक




नागपूरमध्ये नात्यातील वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकरावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही थरारक घटना सोमवारी दुपारी महाल परिसरातील लाकडी पुलाजवळ घडली. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आकाश गुलाबराव ढोमणे (शिवाजी नगर) हा ऑटोचालक आहे. आरोपी गणेश दिलीप वानखेडे (वय ३५) याच्या पत्नीसोबत आकाशचे संबंध असल्याचा संशय गणेशला होता. याच संशयातून आणि कौटुंबिक कलहामुळे गणेशच्या मनात तीव्र राग धुमसत होता. सोमवारी दुपारी गणेश वानखेडे हा महाल परिसरातील लाकडी पुलाजवळ एका चारचाकी वाहनाच्या आडोशाला दबा धरून बसला होता. आकाश ढोमणे तिथून जात असताना गणेशने त्याला अडवले आणि धारदार चाकूने त्याच्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्याने आकाश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाश ढोमणे याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी गणेश वानखेडे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *