![]()
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी होती. जानेवारी महिन्यात त्यांचे अपघाती निधन झाल्याने राजकारणात मोठा पेच निर्माण झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु, आगामी अर्थसंकल्पाचे कारण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्रीपद स्वतःकडेच ठेवले. सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांकडे या पदाची सातत्याने मागणी केली, मात्र अद्यापही त्यांना हे पद मिळालेले नाही. या घटनेला आता जवळपास 9 महिने उलटून गेले आहेत, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थमंत्रीपद देण्यात आलेले नाही. अजित पवार यांच्याकडे असलेले हे महत्त्वाचे खाते अद्याप राष्ट्रवादीला न मिळाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला असून, सुनेत्रा पवार यांना हे पद कधीच मिळणार नाही, असा मोठा दावा केला आहे. ..त्यामुळे मी भाजपपासून लांब या मुद्द्यावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, सुनेत्रा पवार यांना अर्थमंत्री पद मिळणार नाही, भाजपला मी फार ओळखतो. त्यामुळे मी भाजपपासून लांब आहे, अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरून घेतलेले आहे. याशिवाय, अजित दादांना त्यांच्या पक्षातील आणि भाजपमधील दोघेही न्याय देऊ शकले नाहीत, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ‘तुकाराम मुंढे यांच्यावर आम्हाला विश्वास’ तर एमपीएससी संदर्भातील चौकशी समितीबाबत बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, आमचा विश्वास तुकाराम मुंढे यांच्यावर आहे, तपासाची जी समिती आहे ते तपास करतील. आम्हाला काही विद्यार्थी येऊन भेटून गेले आहेत. ते विद्यार्थी तुकाराम मुंढेंना देखील भेटतील, त्यांना पुरावे देतील आणि लवकरात लवकर सगळे शोधून काढतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुढे ते म्हणाले, आता जे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत, त्यांच्याबाबत आम्ही बॅकग्राऊंड चेक केलेले आहे, नकारात्मक आम्हाला काही मिळाले नाही. आता तपास करून कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. ही देखील बातमी वाचा.. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या:रोहित पवार म्हणाले, 5 हजारांची मदत क्रूर थट्टा; दिवाळीपूर्वी आंदोलन करणार राज्यातील दुष्काळी परिस्थिती भीषण असून, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता हेक्टरी एक लाख रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. सरकारकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवाळीपूर्वी मोठे आंदोलन उभारणार असून, सरकारला दिवाळी साजरी करू द्यायची नाही, असा इशाराही त्यांनी दिला. वाचा सविस्तर
Source link
'अजितदादांच्या निधनानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरले':आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले- सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही