Headlines

"प्रश्न विचारू नका.. प्रश्न विचारला की हात उचलला जातो":लाठीचार्जवरून सुमित राघवन यांची खोचक प्रतिक्रिया; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा




नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी राजधानी दिल्लीत आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून तसेच विरोधी पक्षांकडून केली जात आहे. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने ‘चलो संसद’ मोर्चा सुरू केला, मात्र त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ आता अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते सुमित राघवन यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सुमित राघवन म्हणाले, “प्रश्न विचारू नका.. जे चालले ते चांगलेच चालले आहे. प्रश्न विचारले की, देशाचे नाव खराब होते. आमच्या महाराष्ट्रातही पाहिले, प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान होतो. पण एखाद्या राजकीय नेत्याच्या गुंडांनी डॉक्टरांना बेदम मारले, पूल कोसळले, पूरपरिस्थितीत लोकांना तीन-तीन दिवस वीज मिळाली नाही. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही..” प्रश्न विचारले की, हात उचलला जातो पुढे बोलताना सुमित राघवन म्हणाले, “प्रश्न विचारले की, हात उचलला जातो. सोशल मीडियावर सगळीकडे तेच दिसत आहे. ही लोकशाही आहे की नही? त्या मुलांची चूक तरी काय आहे? हे सगळे संवादातून सोडवता आले असते. प्रशासनाला आधीच कल्पना होती, मग विद्यार्थ्यांशी चर्चा का झाली नाही? मुलांना किती मारले आहे. ही मुलं कोण आहेत? आपल्या देशाचीच आहेत न? महाराष्ट्रातील एका नेत्यांने मुलांचा उल्लेख दहशतवादी असा केला..” तुमच्या खुर्चीवरून उठा, विद्यार्थ्यांशी संवाद साधा “ही मुळे दहशतवादी नाहीत, ही आपल्या देशाचे भविष्य आहेत. कृपया तुमच्या खुर्चीवरून उठा, विद्यार्थ्यांशी संवाद साधा. त्यांच्या खांद्यावर हात ठेवा, त्यांना आत्मविशास द्या. घरातील मोठी माणसं जशी मुलांशी प्रेमाने बोलतात, तसेच त्यांच्याशी बोला”, असे आवाहन देखील सुमित राघवन यांनी केला आहे. या मुलांना माझा सलाम तसेच “या मुलांना माझा सलाम. किती ताकद आहे त्यांच्यात.. मी खूप मोठा कलाकार नाही, एक सामान्य नागरिक आहे. पण मी तुमच्या सोबत आहे. जय हिंद!” असे म्हणत सुमित राघवन यांनी विद्यार्थ्यांचे या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनाचे कौतुकही केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *