Headlines

Sunetra Pawar Baramati Politics & Ajit Pawar Accident Probe Statement


राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी एका विशेष मुलाखतीत विविध राजकीय प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यामध्ये पक्षाचे भवितव्य, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा, बारामतीचे नेतृत्व आणि दि

.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विचारले असता, सुनेत्रा पवार यांनी अशा प्रकारच्या चर्चेची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. अजित पवार घरात राजकीय विषयांवर फारसे बोलत नसत, असेही त्यांनी नमूद केले. यामुळे अजित पवार यांच्या हयातीत विलीनीकरणाबाबत निश्चित चर्चा झाली होती का, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

बारामती ही अजितदादांची होती आणि यापुढेही अजितदादांचीच राहील

बारामतीच्या राजकीय नेतृत्वाबाबत बोलताना सुनेत्रा पवार यांनी ठाम भूमिका मांडली. “बारामती ही अजितदादांची होती आणि यापुढेही अजितदादांचीच राहील,” असे त्या म्हणाल्या. अजित पवार यांनी बारामतीत निर्माण केलेली विकासाची परंपरा आणि राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीचे प्रतिनिधित्व कोण करणार, या प्रश्नावर आपणच बारामतीचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. यामुळे आगामी निवडणुकीतील जय पवार यांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चांना त्यांनी अप्रत्यक्षपणे पूर्णविराम दिल्याचे मानले जात आहे.

संवेदनशील विषयाचे राजकारण करणे योग्य नाही

अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. मात्र, या संवेदनशील विषयाचे राजकारण करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचा हा इशारा अपघाताबाबत सातत्याने संशय उपस्थित करणाऱ्या रोहित पवार यांच्याकडे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार किंवा नेते आपल्या पक्षात आले, तर त्यांचे स्वागत केले जाईल, असे सांगत त्यांनी पक्षविस्ताराचे संकेत दिले. राज्यभर दौरा करून संघटना मजबूत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मुलाखतीतून सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्र नेतृत्व उभे करण्याचा आणि अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्धार अधोरेखित केला.

हेही वाचा…

अपघातग्रस्त विद्यार्थिनीला सुनेत्रा पवारांची तत्पर मदत:ताफा थांबवून रुग्णालयात दाखल केले, संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी बारामतीत विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. अपघातग्रस्त तरुणीला पाहताच त्यांनी आपला ताफा थांबवला, तिची विचारपूस केली आणि तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळोची एमआयडीसी रस्त्यावर एका विद्यार्थिनीला टेम्पोची धडक बसली. धडकेनंतर ती वाहनासह रस्त्यावर पडून जखमी झाली होती. त्याचवेळी विकासकामांच्या पाहणीसाठी जाणारा सुनेत्रा पवार यांचा ताफा तेथून जात होता. अपघाताचे दृश्य दिसताच त्यांनी त्वरित गाडी थांबवून घटनास्थळी धाव घेतली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.