![]()
प्रा. अभिजीत इंगळे यांनी ‘द यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि.’ आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त ‘स्व. लक्ष्मणराव इनामदार स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धा’ घेण्यात आली होती. या यशाबद्दल त्यांचा बँकेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. बँकेचे अधिकारी विनोद वानखडे यांच्या हस्ते प्रा. इंगळे यांना ७ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. खुल्या गटात त्यांनी हा द्वितीय क्रमांक मिळवला. प्रा. अभिजित इंगळे हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागात कार्यरत आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ३ हजार निबंध प्राप्त झाले होते. सहकार क्षेत्रातील मूल्ये, सामाजिक जाणीव आणि वैचारिक लेखनाला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. प्रा. इंगळे यांच्या अभ्यासपूर्ण आणि चिंतनशील लेखनाची परीक्षकांनी दखल घेतली. सहकार क्षेत्राशी निगडित सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि ग्रामीण विकास या विषयांवरील त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे त्यांना हा बहुमान मिळाला. त्यांच्या या यशामुळे विद्यापीठ वर्तुळात तसेच साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे. पुरस्कार प्रदान करतेवेळी बँकेचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Source link
प्रा. अभिजीत इंगळे यांना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक:यवतमाळ अर्बन बँकेने आयोजित केली होती स्पर्धा