Headlines

चांदुर रेल्वेत 1 कोटींचा गुटखा जप्त:10 टन सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा साठा पकडला




अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत चांदूर रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी करून पोलिसांनी सुमारे १ कोटी १ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये १० टन सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवार, १२ मे रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना अवैध गुटख्याची मोठी वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने सापळा रचून नाकाबंदी केली. मालखेड रेल्वे हद्दीत संशयास्पद वाटणारा ट्रक (क्रमांक एमएच ०१- सिव्ही ४९६२) पोलिसांनी अडवला. ट्रकची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा साठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी ७५ लाख ७५ हजार रुपये किमतीचा १० टन गुटखा, २५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ६० हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन, असा एकूण १ कोटी १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या गुटख्यामुळे चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याचा संपूर्ण परिसर व्यापून गेला होता. या प्रकरणी ट्रक चालक शेख इमरान शेख मुस्कान (वय ३६, रा. पठाण चौक, अमरावती) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात अन्य ३ ते ४ आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले असून, ते सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, एसडीपीओ अनिल पवार आणि पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात पोलीस उपनिरीक्षक विना पंडे, रोहित कुदळे, नीतेश आझाडे यांच्यासह १३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *