![]()
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना तातडीने शिक्षा देण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ स्थापन करण्यात येतील, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी आभार मानत स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी थेट सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, केवळ ट्विट करून चालणार नाही तर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी आक्रमक मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींची ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ची घोषणा नीट आणि इतर परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट असून जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “पेपरफुटी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्स बनवले जातील. देशातील युवा वर्गाचे हित आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणालाही कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. रोहित पवारांचा संतप्त सवाल आणि सरन्यायाधीशांवर निशाणा पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियारून एक पोस्ट शेअर केली. त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले, मात्र न्यायव्यवस्थेतील भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले. रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “आदरणीय पंतप्रधान साहेब, अखेर आपण कठोर भूमिका जाहीर केली, फास्ट ट्रॅक कोर्टची घोषणा केली त्याबद्दल आपले आभार! पण युवा वर्गाला ‘कॉकरोच’ म्हणणारे आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या सुनावणीला ‘टाईमपास’ समजणारे सरन्यायाधीश सूर्यकांत साहेब योग्य निकाल देतील का? त्यांच्या मते टाईमपास असलेल्या या विषयावर सुनावणी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ तरी असेल का?” धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या घोषणेवरच न थांबता रोहित पवार यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर केवळ सोशल मीडियावर भूमिका मांडून प्रश्न सुटणार नाही, असे ते म्हणाले. “केवळ ट्विट करून चालणार नाही, तर या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी स्वीकारून आधी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. हेही वाचा.. वंचित बहुजन आघाडीचा आज ‘महाराष्ट्र बंद’:कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात, विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सविस्तर वाचा जंतर-मंतरवर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष:CJP समर्थकांनी दगडफेक केली, ACP जखमी; पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले; 16 मेट्रो स्टेशन बंद दिल्लीतील जंतर-मंतरजवळ बुधवारी रात्री 8:30 च्या सुमारास विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेस येथील टॉल्स्टॉय मार्गाजवळ काही उपद्रवींनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एसीपी कनॉट प्लेस विवेक भगत जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. ज्यात आंदोलकांच्या हातात लाठ्याही दिसत आहेत. ते पोलिसांवर हल्ला करत आहेत. ही झटापट सुमारे 15 मिनिटे चालली. त्यानंतर परिस्थिती सामान्य आहे. सविस्तर वाचा
Source link
फास्ट ट्रॅक कोर्टचे स्वागत, पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कधी?:पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर रोहित पवारांचा सवाल