![]()
शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. दोन्ही गटांनी एकत्र आल्यास पक्षाची शक्ती वाढेल, असे मत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कडू यांच्या मते, एकनाथ शिंदे यांनी दोन गोष्टींमध्ये माघार घ्यावी, तर उद्धव ठाकरे यांनीही दोन गोष्टींमध्ये माघार घ्यावी. यामुळे पुन्हा शिवसेना एकत्र येऊन कामाला लागेल, असे ते म्हणाले. शिवसेना हे महाराष्ट्राच्या मातीतील आणि भूमीतील संघटन आहे. ते मजबूत राहणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे कडू यांनी नमूद केले. हे माझे वैयक्तिक मत आहे. योग्य नियोजन झाल्यास शिवसेनेची ‘वज्रमूठ’ कशी तयार होते, हे पाहण्यास हरकत नाही, असे ते म्हणाले. तसेच, आज जे लोक फुटलेले दिसतात, त्यात केवळ त्यांच्याच चुका नाहीत, तर नेतृत्वाच्याही काही चुका आहेत, त्या तपासल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. राजकारण हे बेरजेचे असते, वजाबाकीचे नाही. त्यामुळे केवळ फुटणारे लोकच याला जबाबदार कसे असतील, असा सवाल त्यांनी केला. निंबाळकर यांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना, न्यायालयात निकाल उशिरा लागणे हे देखील अन्यायकारक असल्याचे कडू यांनी म्हटले.
Source link
बच्चू कडू म्हणतात दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे:शिंदे-ठाकरे गटाने दोन-दोन पाऊले मागे घेतल्यास पक्षाची ताकद वाढेल