Headlines

बेलापुरात 9 जुलैला विसावणार निवृत्तीनाथांची पालखी:लाडक्या घोड्याने ठरवलेला वारीचा मार्ग; बेलापूर बु. ग्रामपंचायतीत अधिकाऱ्यांची बैठक‎



श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळ्याचे ९ जुलै रोजी बेलापूर (बु.) येथे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिर

.

बेलापूर येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात या पालखीचा मुक्काम होतो. यावेळी सोपानराव हिरवे, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीना साळवी, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी प्रशासनाला ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू असलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली. या बैठकीस विस्तार अधिकारी विजय चराटे, सुनील माळी, उपअभियंता गौरव कांबळे, विशाल आळंजकर, ॲड. अरविंद साळवी, डॉ. अश्विनी लिपटे उपस्थित होते.

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा आणि बेलापूर गावचे नाते ऐतिहासिक आहे. बेलापूरचे भानुदास महाराज हिरवे यांना संत निवृत्तीनाथांनी स्वप्नात दृष्टांत देऊन समाधीचा शोध घेण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी संत गंगागिरी महाराज व जोधपूर पाटील यांच्या मदतीने त्र्यंबकेश्वर येथे बेलपत्राच्या जागेवरून समाधी शोधली.

त्यानंतर आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघताना मार्ग कसा निश्चित करायचा, हा प्रश्न होता. तेव्हा हिरवे महाराजांच्या ‘लाडक्या’ नावाच्या घोड्याने हा मार्ग ठरवला. हा घोडा जिथे उभा राहायचा तिथे दुपारची विश्रांती आणि जिथे बसायचा तिथे पालखीचा मुक्काम ठरवला गेला. याच घोड्याचा पुढे बेलापूर येथे मुक्कामी असताना मृत्यू झाला, त्याची समाधी आज ही बेलापुरात भक्तांचे श्रद्धास्थान आहे. हीच वारकरी संप्रदायाची परंपरा आज मनू महाराज व सोपान महाराज पुढे चालवत आहेत.

असा असेल दिंडीचा मार्ग २९ जून: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान. मुख्य मुक्काम मार्ग: पेगलवाडी, सातपूर, गणेशवाडी, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी आणि ९ जुलैला बेलापूर बु. येथे मुक्काम. पुढील प्रवास: राहुरी, डोंगरगण, अहिल्यानगर, साकत, घोगरगाव, मिरजगाव, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊरकंदर, दगडी अकोले, करकंब, चिंचोली. २४ जुलै: सायंकाळी ७ वाजता पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल. परतीचा प्रवास: २९ जुलै रोजी पंढरपूरहून निघून १५ ऑगस्ट रोजी पालखी पुन्हा त्र्यंबकेश्वरला पोहोचेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *