Headlines

भंडारदरा 35टक्के भरले, मुळा धरणात यंदा प्रथमच नवीन पाण्याची आवक:भंडारदऱ्यात 24 तासांत 400 दलघफू नवे पाणी, हरिश्चंद्रगड परिसर जलमय



जून महिना कोरडा गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाची आणि अकोलेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह संपूर्ण अकोले तालुक्यात शनिवारपासून पावसाने धुवाधार ‘बॅटिंग’ सुरू केली आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत घाटघर आणि रतनवाड

.

पाऊस असाच कोसळत राहिल्यास मंगळवारपर्यंत धरणाचा साठा ५ हजार दलघफूटांचा टप्पा ओलांडेल. दरम्यान, भंडारदऱ्याच्या जलविद्युत प्रकल्पातून २६९७ क्युसेक्स वेगाने निळवंडे धरणात विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे निळवंडेच्या साठ्यातही वेगाने वाढ होत आहे.

दुसरीकडे, हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरातील जोरदार पावसामुळे मुळा नदीला पूर आला असून कोतूळजवळून ६ हजार २६० क्युसेक्स वेगाने पाणी राहुरीच्या मुळा धरणाकडे झेपावत आहे.

सोमवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांहून झालेला मिमीमधे पाऊस खालीलप्रमाणे. कंसातील अंक १ जूनपासून या पावसाळ्यातील एकुण पावसाचे आहेत. घाटघर १४० (८२१), रतनवाडी ११३ (५८९), पांजरे ८६ (४७९), भंडारदरा धरण क्षेत्रावर ७२ (३९२), निळवंडे धरण क्षेत्रावर ३८ (१८८), कोतूळ १९ (९७), अकोले १७ (७९), मुळा धरण क्षेत्रावर ९ (९७), आढळा धरण क्षेत्रावर ७ (५७), भोजापूर धरण क्षेत्रावर ४ (४४), संगमनेर ५ (७०), ओझर साठवण तलाव क्षेत्रात ११ (५६), आश्वी ४ (४६), लोणी २ (३६),श्रीरामपूर ३ (९७), राहाता ४ (६४), कोपरगाव ९ (१३६), राहुरी ३ (८८), नेवासा ५ (१२१) अहिल्यानगर ४ (७५) तर अकोले तालुक्याशेजारी नाशिक १९ (१२५), त्र्यंबकेश्वर २० (२७१), इगतपुरी ११० (५२९), घोटी ८९ (३६२). धुवाधार पावसामुळे कळसूबाई- हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य, साम्रदची सांदण दरी आणि घाटघर परिसरातील मातीचे कडे निसरडे झाले आहेत. अशा परिस्थितीतही पर्यटक आणि सेल्फीशौकीन तरुण नियमांची पायमल्ली करत धबधब्यांच्या टोकापर्यंत पोहोचत आहेत. निसरड्या कड्यांवर उभे राहून मोबाईलमध्ये छबी बंदिस्त करण्याचे जीवघेणे प्रयत्न सुरू आहेत.

भात आवणीला वेग; पाणीपातळी वाढणार शनिवारपासून सुरू असलेल्या या संततधारेमुळे अकोल्याच्या आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील भातखाचरांमध्ये पाणी तुडुंब भरले आहे. त्यामुळे खोळंबलेल्या भात लावणीच्या (आवणी) कामांना प्रचंड वेग आला असून शेतकरी शेतात गुंतला आहे. या पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *