Headlines

महामार्गावरील खड्डे बुजवा; संभाजी ब्रिगेड झाले आक्रमक:अभियंत्यांना निवेदन सादर करीत आंदोलनाचा इशारा‎




राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, भेगाही पडल्याने संभाजी ब्रिगेड सोमवारी आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांना निवेदन सादर केले. रस्त्याची दुरुस्ती तातडीने करून संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग येथील बाळापूरकडे जाणाऱ्या जगदंबा हॉटेल समोरील टी पॉइंटपासून तुषार हॉटेल समोर ते रेल्वे फाट्यापर्यंत सार्वजनिक रोडवर खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या मध्य भागावर भेगा पडल्या असून निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे राष्ट्रीय महामार्ग रोडवर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या रस्त्यावर दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग वरील टी पॉइंट जवळील रस्त्याची रेल्वे फाट्या पर्यंत च्या रोडची वाईट अवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना एक खड्डा चुकविणे सुद्धा कठीण आहे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या माणसांची हाडे व वाहनांचे सर्व भाग खिळखिळी झाली आहेत. राष्ट्रीय महामार्ग जवळील जगदंबा हॉटेल समोर टी पॉइंट ते रेल्वे फाट्यापर्यंत रोडवरील खड्डे प्रशासनाने तत्काळ आवश्यक ती चौकशी करून खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष देवा गावंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला सादर करण्यात आले. यावेळी ऋषभ काळे, हर्षल इंगळे, कैलास ताले, पंकज बाजोड, धर्मा कारळे, गोपाल खाडे पाटील, यश जाधव, वेदांत साखरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कंत्राटदारावर गुन्हा नोंदवा रस्त्यावरील खड्डे अनेक वेळा बुजवण्यात आले. काही वेळावर सिमेंट कांँक्रिटचे मोठे पॅचही तयार करण्यात आले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे काम करत असल्यामुळे पावसाळ्यामध्ये या रोडवर मोठमोठे खड्डे पडत आहेत. सार्वजनिक रस्त्याचे डांबरीकरण करताना निकृष्ट दर्जाचे मटेरियल चा वापर संबंधित कंत्राटदाराने केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराची चौकशी प्रशासनाने करणे गरजेचे आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते तरी भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता वाढली असून भविष्यात होणारे अपघात थांबवण्यासाठी प्रशासनाने चांगल्या प्रकारे खड्डे बुजवणे गरजेचे आहे ज्या कंत्राट दाराने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे त्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *