Headlines

रुग्ण बरे करणाऱ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात:परिषदेत मंथन, डॉ. पचलोरे फाउंडेशनतर्फे ‘हीलिंग द हीलर्स'' आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन‎




डॉ. पचलोरे फाउंडेशनच्या वेलनेस अँड हेल्थ ऑर्बिटने, एम्स नागपूर आणि एम्स रायपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य भारतातील आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी ‘हीलिंग द हीलर्स’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यशाळेने वैद्यकीय व्यावसायिकांना आत्मचिंतन करण्याची संधी दिली. यामध्ये करुणा थकवा इतरांची काळजी घेण्यामुळे येणारा मानसिक थकवा आणि बर्नआऊट (कामाच्या तणावामुळे निर्माण होणारी स्थिती) यांसारख्या गंभीर समस्यांवर उपाययोजना सुचवण्यात आल्या. या परिषदेचे उद्घाटन आणि मार्गदर्शन डॉ. विक्रमसिंह पचलोरे (कुलपती, मॅस्ट्रो मल्टिव्हर्सिटी, भारत), डॉ. प्रशांत पी. जोशी (कार्यकारी संचालक, एम्स नागपूर), लेफ्टनंट जनरल (डॉ.) अशोक कुमार जिंदाल (कार्यकारी संचालक, एम्स रायपूर), डॉ. लोकेंद्रसिंग (संचालक, सीआयआयएमएस नागपूर), जस्टिना क्रुकोव्स्का (संचालक, जेबीएल, पोलंड) यांच्या उपस्थितीत झाले. मानवी इतिहासात आरोग्यसेवा व्यावसायिकांचे मानसिक व शारीरिक आरोग्य ज्या वेगाने खालावत आहे, तसे यापूर्वी कधीही झाले नव्हते. यामुळे अनेक जण हे क्षेत्र सोडत आहेत, तर काही जण तीव्र नैराश्य आणि आत्महत्येसारख्या टोकाच्या पावलांकडे ओढले जात आहेत. जर आपण डॉक्टरांचीच काळजी घेतली नाही, तर आपली काळजी कोण घेणार? त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हा मानवतेविरुद्धचा गुन्हा ठरेल, म्हणूनच आरोग्यसेवकांची काळजी घेणे ही मानवतेची गरज असल्याचे मत डॉ. विक्रमसिंह पचलोरे यांनी व्यक्त केले. अनेक डॉक्टर लोकांची सेवा करण्याच्या भावनेने या क्षेत्रात येतात. पण वर्षानुवर्षे इतरांचा ताण पेलल्यानंतर, डॉक्टरांनाही स्वतःला ताजेतवाने आणि ऊर्जावान करण्यासाठी अशा परिसंवादाची अत्यंत गरज असते. वैद्यकीय क्षेत्र हा व्यवसाय नसून ‘सेवावृत्ती’ असल्याचे मार्गदर्शन डॉ. प्रशांत जोशी यांनी केले. भारतात अती कामाचा बोजा आणि कामाच्या ठिकाणी होणारी हिंसा यामुळे डॉक्टरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. यावर मात करण्यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले आहेत. यात समवयस्क आधार नेटवर्क मनातील ताण व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांचे अंतर्गत गट असावेत, कामाच्या व्यस्त वेळेत मज्जासंस्थेला शांत करण्यासाठी जाणीवपूर्वक छोटे विराम घ्यावेत, एकात्मिक आरोग्यासाठी योग आणि आयुर्वेद यांसारख्या पद्धतींचा डॉक्टरांनी स्वतःसाठी वापर करावा, असे ले. जनरल (डॉ.) अशोक कुमार जिंदाल म्हणाले. या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय उपक्रमात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञयांनी सहभाग नोंदवला. “मन, शरीर,आत्मा यांचा मेळ : जस्टिना क्रुकोव्स्का विज्ञान आणि वैद्यकशास्त्रात प्रगती झाली असली, तरी रुग्णांच्या काळजीमधील ‘आध्यात्मिक पैलू’ समजून घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय व्यावसायिकांना केवळ आजारावर उपचार करायचे नसून रुग्णांच्या जीवनात नवी आशा निर्माण करायची असते. मन, शरीर, आत्मा यांचा मेळ असल्याचे मत पोलंडच्या तज्ज्ञ जस्टिना क्रुकोव्स्का यांनी व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *