![]()
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या (महालक्ष्मी) चरणी असलेला सुवर्ण आणि रत्नखजिना केवळ श्रद्धेचा विषय नसून महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे. 17 व्या शतकापासून विविध सत्ताधीशांनी अर्पण केलेल्या या दागिन्यांचे 3 वर्षांपूर्वी झालेले मूल्यांकन 21 कोटी 1 लाख 54 हजार रुपयांवर पोहोचले आहे. मात्र, अनेक दागिने ऐतिहासिक आणि अतिदुर्मीळ ‘अँटिक’ प्रकारातील असल्याने त्यांचे खरे मूल्य ठरवणे अशक्य मानले जाते. करवीरचे छत्रपती दुसरे संभाजी महाराज यांच्यापासून ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांपर्यंत सर्व अधिपतींनी देवीला मौल्यवान अलंकार अर्पण केले. साताऱ्याचे छत्रपती घराणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे घराणे तसेच अनेक सरदार-संस्थानिकांनी देवीच्या चरणी सुवर्णदागिने अर्पण करून भक्ती व्यक्त केली आहे. नित्य व उत्सवकालीन अलंकार व्यवस्था अशी असते देवीच्या नित्यपूजेत 26 हून अधिक प्रमुख अलंकार वापरले जातात. यामध्ये सोन्याचा किरीट, हिऱ्याची नथ, मोतीसतरा, सोन्याचे नऊ दागिने, ठुशी, दोन कुंडले, मोरपक्षी, 16 पदरी चंद्रहार, 6 आकडेसमोरी, म्हाळुंग, 74 मणी बोरमाळ आणि 49 मोहरांची माळ यांचा समावेश होतो. दागिन्यांमागील रंजक तथ्ये आणि वैशिष्ट्ये नित्य व उत्सवकालीन अलंकारांसाठी विशेष लॉकर
Source link
कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या खजिन्यात 21 कोटींचे अँटिक दागिने:17 व्या शतकापासूनच्या देवीच्या नित्यपूजेत 26 हून अधिक प्रमुख अलंकार वापरले जातात