.

जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवणे सध्या महाकठीण झाले आहे. डिजिटल कटकटी अर्थात नोंदी नसणे, सर्व्हर डाऊन असणे, ऐनवेळी पोर्टल खुले न होणे यासह जुने प्रमाणपत्र, मनपातील नोंदणी, रुग्णालयातील नोंदी, स्मशान घाटावरील पावती, ओळखपत्र व त्यांचे प्रमाणिकरण, अर्जात अचूक माहिती सादर करणे त्यांना प्रतिज्ञापत्रासह विविध कागदपत्रे जोडणे अनिवार्य झाल्यामुळे सध्या जन्म-मृत्यूचे दाखले काताना नागरिक त्रस्त होत आहे. कहर म्हणजे २०१६ च्या आधीचे ऑफलाईन नोंदी असलेले ‘ॲड ओल्ड इव्हेंट’ प्रमाणपत्र मिळण्यासाठी अजुनही तीन ते चार महिनेच वाट बघावी लागत आहे. कारण, हे प्रमाणपत्र जारी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे (डीएचओ) केवळ एकच आयडी आहे. आणि जर त्यांनी दिवसातून दोन तासही हे प्रमाणपत्र मंजूर करण्यास दिले तरी मनपा क्षेत्रासाठी त्यांना फारतर १० ते १५ प्रमाणपत्रांवर आयडी देता येईल. कारण त्यांना संपूर्ण जिल्ह्यासाठीच प्रमाणपत्रावर आयडी द्यावी लागते. अशा एकूणच स्थितीमुळे अजुनही २०१६ च्या आधीच्या नोंदी असलेले जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देणे ही सुलभ बाब राहिली नाही. दिवसभरात मनपा असे १०० दाखले देत आहे. कारण, यांची आयडी ही मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसह एक आरोग्य अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे. डॉ. मंगेश गोंदावले, आयुक्त, मनपा.
विशेष यंत्रणा उभी करण्यात आली आहे Q. दाखले किती शिल्लक आहेत? A. सध्या ६५०० दाखले शिल्लक असून यात २०१६ च्या आधीची नोंद असलेल्यांचा समावेश आहे. Q. दाखले देण्याचा वेग एव्हाना वाढला नाही काय? A. वाढला आहे. यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात आली आहे. Q. जुने दाखले देण्यात नेमकी अडचण कोणती? A. हे जुने दाखले डीएचओंच्या आयडीने जारी होतात. त्यांच्याकडे वेळ कमी असल्यामुळे ते केवळ दोनच तास काम करू शकते. Q. शिल्लक निकाली काढण्यासाठी किती दिवस लागतील? A. आधी दिवसाला ६० दाखले दिले जायचे. आता १५० दाखले देत आहोत. ६५०० दाखले निकाली काढायचे असतील तर त्यासाठी किमान ९० दिवस लागतील.
अॅड ओल्ड इव्हेंटसाठीच सर्वाधिक वेळ लागतो ^अॅड ओल्ड इव्हेंटसाठीच (२०१६ च्या आधीचे दाखले) सर्वाधिक वेळ लागतो. कारण हे दाखले जारी करण्यासाठी केवळ एकच आयडी असून दिवसातून ५० ही दाखले जारी होत नाहीत. एकिकडे अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत असून दाखले देण्याची गती मात्र कमी आहे. – डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा.
चार टप्प्यांमुळे प्रमाणपत्र मिळणे झाले अवघड जन्म असो अथवा मृत्यू प्रमाणपत्र. जर ते २०१६ च्या आधीचे असेल तर त्यासाठी जुना दाखला तपासून घेणे, मनपात, रुग्णालयात, स्मशानभुमीत असलेल्या लेखी नोंदींवरून त्याची शहानिशा करणे. ओळखपत्र, प्रतिज्ञापत्र सादर करणे व अचूक माहितीसह अर्ज सादर करणे. त्यानंतर तो जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवणे, आयडी मिळवणे अवघड झाले आहे.