Headlines

वेट लिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूर, नाशिकची सरसी:खेळाडूंनी पटकावली पदके, 60 किलो वजन गटात अमरावतीचा सुरज इंगोले उपविजेता‎




येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय वेट लिफ्टिंग क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये राज्यातील विविध विभागांतील १७ व १९ वर्षांखालील ३०० मुले-मुली सहभागी झाले असून स्पर्धेत कोल्हापूर आणि नाशिकच्या खेळाडूंनी चमकदार खेळाचे प्रदर्शन करत आघाडी घेतली आहे. अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई आणि नाशिक या विभागांतील सुमारे ३०० खेळाडू, पंच, तांत्रिक अधिकारी आणि व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील विविध वजनी गटांचे सामने जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी व दुपारच्या सत्रात पार पडत आहेत. स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या ५६ किलो वजनी गटात कोल्हापूर विभागाच्या अर्थव धोकटे याने प्रथम क्रमांक पटकावला. नाशिक विभागाच्या अवधूत आहाळे यांनी द्वितीय, तर मुंबई विभागाच्या अल्ताफ कनोजियाने तृतीय क्रमांक मिळवला. ६० किलो वजनी गटात नाशिक विभागाच्या रोहन माळोराव यांनी प्रथम, अमरावती विभागाच्या सुरज इंगोले यांनी द्वितीय, तर कोल्हापूर विभागाच्या आदित्य माळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ६४ किलो वजनी गटात कोल्हापूर विभागाच्या केशवकुमार फार्थ शिंदे यांनी प्रथम, पुणे विभागाच्या यश बुडु यांनी द्वितीय, तर नाशिक विभागाच्या योगराज सपकाळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. ७१ किलो वजनी गटात नाशिक विभागाच्या श्रावण आदटवार यांनी प्रथम, अमरावती विभागाच्या हर्षल राऊत यांनी द्वितीय, तर मानसर महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला.७९ किलो वजनी गटात नाशिक विभागाच्या शुभम चंडाळे यांनी प्रथम, मुंबई विभागाच्या अर्णव चौधरी यांनी द्वितीय, तर पुणे विभागाच्या अर्णव दांडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वाघाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचा समारोप गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, तपोवन चौक, अमरावती येथे झाल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *