Headlines

अक्कलकोटला सावनी-ऋषिकेशच्या गाण मैफलीत बरसले ‘सूर आनंदघन’:दुसऱ्या पुष्पात सावनी रवींद्र, ऋषिकेश रानडे यांच्या गीतांनी रंगली मैफल‎



श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने

.

बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी महोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पात सावनी रवींद्र, पुणे प्रस्तुत ‘सूर आनंदघन’ या लोकप्रिय मराठी गीतांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय पुरस्कार आणि लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र, सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचे निवेदन दीप्ती भागवत यांनी केले. उपस्थित रसिकांनी या मैफिलीला उत्स्फूर्त दाद दिली.

सदर कार्यक्रम श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था आणि समस्त हिरकणी सखी महिलांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संचलित अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमी, गट क्रमांक ५८१, नवीन वाहनतळ, विरक्त मठाशेजारी, अक्कलकोट येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. श्री तुळजाभवानी माता, श्री समर्थरूपी अन्नपूर्णा माता, राजमाता जिजाऊ आणि भारतरत्न, गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमांचे तसेच नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. महोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पाचे दीपप्रज्वलन मनोरमा सहकारी बँक, सोलापूरच्या शोभाताई मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका कस्तुराबाई चौगुले, जाहिराबी शेख, अपर्णाताई सिद्धे आणि अमृताताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, दर्शना लेंगडे-खोबरे, तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, दिव्या मोरे, स्मिता कदम, स्वाती निकम, संगीता भोसले, उज्ज्वला भोसले, अंजना पवार, पल्लवी कदम, कोमल क्षीरसागर, रूपा पवार, शीतल क्षीरसागर, तृप्ती बाबर, स्वप्ना माने आणि ज्योती शिंदे यांच्यासह हिरकणी सखी महिला उपस्थित होत्या. या सर्वांच्या हस्ते कलाकारांचा श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. पुरोहित अप्पू पुजारी यांच्या मंत्रोच्चारात आरती संपन्न झाली. या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, मेजर श्रीकांत मोरे, प्रा. सायबन्ना जाधव, श्री व सौ. विनायक बुधले, रोहित पाटील, श्री व सौ. इंजि. किरण पाटील, अविराज सिद्धे, प्रभाकर मजगे, शशिकांत बकरे, यांच्यासह समस्त विश्वस्त मंडळ, सदस्य, कार्यकर्ते, सेवेकरी, सदस्य उपस्थित होते.

गुरुवारी ‘चांद हा नभातला’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी आषुपाल प्रस्तुत ‘चांद हा नभातला’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजित आणि लोकप्रिय गीतकार गुरु ठाकूर यांच्या गाण्यांची सुरेल मैफील या कार्यक्रमात रंगणार आहे. यामध्ये गायक ऋषिकेश रानडे, रसिका शनु, शिवम सिंग आणि सुप्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल सहभागी होणार असून, कार्यक्रमाचे निवेदन दीप्ती भागवत करणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *