Headlines

भाजपचे मूळ कार्यकर्ते आजही सतरंज्याच उचलताहेत:सतेज पाटलांचा भाजपवर घणाघात, जयंत पाटलांच्या प्रवेशाबाबतही केला खुलासा




राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. ‘जयंत पाटील कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाहीत,’ असा ठाम विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. यासोबतच, सतेज पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या अंतर्गत अवस्थेवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. मूळ कार्यकर्ते सतरंज्याच उचलणार भाजपच्या सध्याच्या स्थितीवर बोट ठेवताना सतेज पाटील यांनी आयात नेत्यांवरून भाजपला थेट लक्ष केले. ते म्हणाले, “आज भाजपची अवस्था नेमकी काय झाली आहे? त्यांचे मूळ पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्ते नेमके कुठे गेले आहेत? बाहेरून पक्षात आलेल्या नेत्यांना थेट मोठी पदे दिली जात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाकडून आलेल्या नेत्यांची संख्या आणि ताकद आज भाजपमध्ये मूळ नेत्यांपेक्षा खूप पुढे गेली आहे. तर दुसरीकडे, जे मूळ भाजपवाले पूर्वी सतरंज्या उचलायचे काम करत होते, ते बिचारे आजही सतरंज्या उचलायचेच काम करत आहेत.” मंत्रिमंडळाचा हिशोब पाहा इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांनी भाजपवर कसा ताबा मिळवला आहे, हे स्पष्ट करण्यासाठी सतेज पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाचे थेट उदाहरण दिले. “तुम्ही जर सध्याच्या मंत्रिमंडळाचा आणि सत्तावाटपाचा हिशोब केला, तर तुम्हाला भाजपची खरी परिस्थिती लगेच समजेल. मंत्रिमंडळात मूळ भाजपच्या नेत्यांपेक्षा बाहेरून आलेल्या नेत्यांचाच भरणा जास्त आहे. ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचले त्यांना बाजूला सारून आयात केलेल्या नेत्यांना सत्ता दिली जात आहे,” असा घणाघात त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीसांशी 4 नेत्यांच्या भेटीने संशयाच्या ‘गाठी’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत गेल्या दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवारांच्या रात्री उशिरा भेटीगाठी झाल्या. त्यामुळे संशयाच्या गाठी निर्माण झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांचा प्रयत्न हाणून पाडत मंत्रिपदासाठी खासदार पार्थ पवार लाॅबिंग करत आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची गुरुवारी रात्री उशिरा भेट घेतली. त्यामुळे पटेल नाराज असल्याची चर्चा आहे. १४ जुलै रोजी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या वेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलही उपस्थित होते, असे म्हटले गेले. अर्थमंत्रिपद मिळवण्यासाठी पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते, अशी चर्चा आहे. त्याचे पाटील यांनी खंडन केले. मात्र, तटकरे, पटेल परस्पर मुख्यमंत्र्यांना भेटल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज झाल्या, असे सूत्रांनी सांगितले. हेही वाचा.. पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेले, उपोषणाचा 21 वा दिवस:CJP संस्थापक दीपके म्हणाले -सोनम सरांना शिवीगाळ झाली, ओढत नेले; आंदोलक संतापले दिल्लीतील जंतर-मंतर येथे २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी सफदरजंग रुग्णालयात नेले. आंदोलकांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध केल्यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. दुसरीकडे, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी आरोप केला की, पोलिसांनी सोनम यांना अपशब्द वापरले आणि बळजबरीने ओढत रुग्णालयात नेले. त्यांनी असाही दावा केला की, पोलिसांनी त्यांच्याशीही गैरवर्तन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली. सविस्तर वाचा सोनम वांगचूक प्रकरणावर विरोधक आक्रमक:सरकारच्या भूमिकेवर सवाल; शरद पवार, आदित्य ठाकरेंसह नेत्यांच्या प्रतिक्रिया दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. सलग २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *