Headlines

भिवंडी पालिकेत ACB चा 'सर्जिकल स्ट्राईक':सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना लाच घेताना अटक; अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याची धमकी, अडीच लाखांच्या रकमेसह सापडले जाळ्यात




अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याची धमकी देऊन खिसे गरम करणाऱ्या एका बड्या अधिकाऱ्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी संध्याकाळी रंगेहात बेड्या ठोकल्या. भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ३ (पद्मानगर) चे सहाय्यक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) सुरेंद्र भास्कर भोईर असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. एका खाजगी गाडीत लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना ‘एसीबी’ने हा सापळा यशस्वी केला. नेमकं काय घडलं? धमकी आणि मागणी: सुरेंद्र भोईर हे मूळचे पालिकेत सर्व्हेअर आणि इमारत निरीक्षक आहेत. एका इमारतीच्या सुपरवायझरला (तक्रारदार), “तुझं बांधकाम बेकायदेशीर आहे, ते पाडून टाकीन,” अशी धमकी भोईर यांनी दिली होती. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी तब्बल ५ लाख रुपयांची मागणी केली. घासाघिस झाल्यानंतर लाचेची रक्कम हप्त्यांमध्ये देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी पहिला हप्ता म्हणून २.५ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. सापळा आणि अटक तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी थेट ठाणे ‘एसीबी’कडे तक्रार नोंदवली. मंगळवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास पद्मानगर वॉर्ड ऑफिसच्या पाठीमागे असलेल्या मैदानात, एका खाजगी गाडीत पैसे स्वीकारत असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने भोईर यांना रंगेहात पकडले. सुरेंद्र भोईर यांच्यावर ‘लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणे एसीबी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. ‘क्रेटा’ कारमधील थरार सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांनी लाच स्वीकारण्यासाठी पालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयाबाहेरील मोकळे मैदान निवडले. तिथे उभ्या असलेल्या त्यांच्या स्वतःच्या हुंडाई क्रेटा (Hyundai Creta) कारमध्ये बसून ते अडीच लाखांची रोकड मोजत होते. पण, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने भोईर यांना कारमध्येच रंगेहात पकडले आणि त्यांच्याच गाडीत त्यांचा भ्रष्टाचाराचा डाव उलटवला. लाचखोर अधिकाऱ्याची प्रोफाईल कारवाईचा ठळक घटनाक्रम



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *