Headlines

मनाच्या चंचलतेवर भक्ती, सत्संग हाच उपाय- राजेशकृष्ण महाराज:सुंदरकांड पठणासह होणार सुदामा चरित्राचे सादरीकरण‎




मानवी मन अत्यंत सूक्ष्म आणि चंचल आहे. या चंचलतेमुळे माणसाचे पतन होते आणि अपेक्षित ध्येय साध्य करता येत नाही. सदा भरकटणाऱ्या मनामुळे व्यक्तीचा सर्वंकष विकास खुंटतो. त्यामुळे मनाच्या या चंचलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवंताची भक्ती आणि सत्संग हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. मनात भक्तीची ज्योत सतत तेवत ठेवून चंचलतेचा त्याग करावा, असा अमूल्य उपदेश वृंदावन येथील आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज यांनी केला. माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवनात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या ज्ञानयज्ञाचे चौथे पुष्प गुंफताना राजेशकृष्ण महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले की, केवळ स्थिर मनातच खऱ्या भक्तीची आस निर्माण होऊ शकते. भूतकाळात अनेक संतांनी आपल्या चंचल मनावर विजय मिळवून भक्तीची ज्योत प्रज्वलित केली आणि भगवंताला प्रसन्न करून घेतले. कथेचे मुख्य यजमान उमेश टावरी, मीना टावरी, किशोर लाहोटी, कृष्णा लाहोटी आणि पोथी यजमान हेमा खटोड यांच्यासह माहेश्वरी महिला मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी व समस्त कार्यकारिणीने केले आहे. कृष्णजन्माचा सोहळा अन् मनमोहक देखावा या विशेष सत्रात महाराजांनी वामन अवतार आणि भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची कथा भाषेत मांडली. आसुरी शक्तींचा नायनाट करण्यासाठीच भगवान श्रीकृष्णांनी भूतलावर अवतार घेतला, असे त्यांनी सांगितले. कृष्णजन्माच्या प्रसंगी कथास्थळी भगवान श्रीकृष्णाची अत्यंत सुंदर आणि मनमोहक देखावा साकारण्यात आला होता. देवकी आणि वासुदेव यांच्यासह बालकृष्णाची देखावा पाहण्यासाठी महिला भाविकांनी कथास्थळी गर्दी केली होती. देखाव्यात नंद, यशोदा, बालकृष्णाचे साकारले रूप उत्सवासाठी कथा मंडप रंगीबेरंगी फुगे आणि फुलांनी सजवण्यात आला होता. महिला भाविकांनी “नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की’ चा जयघोष करत, सामूहिक नृत्य सादर करत जल्लोष केला. या प्रसंगी भाविकांना प्रसाद वितरित करण्यात आला. या जिवंत देखाव्यात वामन म्हणून प्रद्युम्न जाजू, यशोदा म्हणून मीना टावरी, नंदबाबा म्हणून उमेश टावरी, बालकृष्ण म्हणून श्रीनय हेडा, किशोर लाहोटी यांनी वासुदेवाची भूमिका साकारली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *