Headlines

मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवा:मी सभागृहात असतो तर पेपरवेट फेकून मारले असते, आम्ही ओरिजनल गुंड, पोलिसांच्या जीवावर उड्या मारत नाही- संजय राऊत




एकनाथ शिंदे यांना ज्या शिवसेनेने मोठे केले आहे, तो पक्ष न्यायालयातून आम्हाला वापस द्यायला लावला पाहिजे. न्यायव्यवस्था विकत घेत तुमची दादागिराी सुरू आहे का? पोलिसांचा माफियासारखा वापर करत तुम्ही ही दादागिरी करत आहात. तुमच्याकडे यंत्रणा आहे म्हणून तुमची ही दादागिरीचा भाषा आहे, ज्या दिवशी हे नसेल त्या दिवशी ही भाषा करुण दाखवाच, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. यंत्रणेच्या जोरावर एखादा नपुंसक सुद्धा मी मर्द आहे असे ओरडून सांगतो. संजय राऊत म्हणाले की, भाऊसाहेब वाघचौरे नावाचे 75 कोटी रुपयांना विकले गेलेले खासदार आहेत त्यांना शिर्डीत यायचे म्हणून ते रस्ते बंद केले. अन् शेकडो शिवसैनिकांना शिर्डीतून बाहेरच्या पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. शिवसेना संपली म्हणता मग ही कसली भीती आहे. पोलिसांनी सुद्धा असे वागू नये. आम्ही ओरिजनल गुंड आहोत. पोलिसांच्या जीवावर गुंडगिरी करत नाही. मुख्यमंत्र्यांनी जनेतची माफी मागावी संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मराठी येत नाही त्यांनी मराठीचा अपमान केला आहे. त्यांना किंवा मुख्यमंत्र्यांनी जनेतची माफी मागितली पाहिजे. विरोधी पक्ष काय करतो आहे हा प्रश्न माझ्यापुढे पडला आहे. मी जर सभागृहात असतो तर मी त्यांच्या दिशेने पेपरवेट फेकून मारले असते. माझ्यासारखे अजून 10 लोकं असते तर जांबुवंतराव धोटे यांचे स्मरण करत मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात आवाज उठवला असता. ..तर मुंबईमध्ये फिरणं अवघड संजय राऊत म्हणाले की, प्रशासनाकडून पावसाळ्यात नवीन कामे काढण्यात आली आहेत मुंबईकरांनी प्रवास कसा करावा. तुमच्याकडे पोलिस आहेत पण सामान्य माणसांचे काय? आम्ही 25 वर्षे मनपा ताब्यात असताना पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे करत होतो, बैठका घेत होतो. पण मनपाने ते काहीच न केल्याने आता जर पाऊस झाला तर मुंबईमध्ये फिरणं अवघड होईल. आमच्या पक्षातून त्यांच्या पक्षात गेलेल्या खासदारांना गावी जाण्यासाठी विमानं देण्यात आली. गद्दार खासदारांना विमानाचा पास एकनाथ शिंदे यांनी काढून दिला आहे.

नार्वेकरांना शोक प्रस्ताव वाचता येत नाही संजय राऊत म्हणाले की, राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांना मराठी लिहीता, वाचता आणि बोलता येत नाही. मराठीत विचार करता येत नाही. हे नार्वेकर आहेत की युरोपातील रहिवासी आहेत? असा सवाल राऊत यांनी केला आहे. हे परकीय नागरिक तर नाहीत ना? रिक्षावाल्यांना मराठी आली पाहिजे असा कायदा तयार केला जातो, मराठीच सक्ती आहे असे मुख्यमंत्री सांगतात आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी येत नाही. त्यांना शोक प्रस्ताव वाचता येत नाही. ज्यांना मराठी येत नाही असा माणूस तिथे बसवला आहे, त्यांना परावरुन बाजूला केले पाहिजे. मराठी येत नाही म्हणून त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणलेले होते. हा मराठीचा अपमान संजय राऊत म्हणाले की, रिक्षावाल्यांना मराठी येत नाही म्हणून आपण मारतो मग आता यांना मारायचे का? मराठी येत नसताना त्यांना विधानसभा अध्यक्षपदावर कोणी बसवले. ज्यांना मराठी येत नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा मराठीचा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा अपमान आहे. भाजपला लाज वाटली पाहिजे जर नार्वेकर यांनी माफी मागितली नसेल तर. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मग नार्वेकरांना मराठी का येत नाही. लोढांना किंवा इतरांना हे पद द्या. त्यांना पदावर बसवणे 106 हुतात्माचा अपमान आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *