![]()
दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनकरणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्यापोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचेपडसाद शुक्रवारी अहिल्यानगरात उमटले. शहरातील वर्दळीच्या दिल्लीगेट परिसरात विद्यार्थी आणि विविध सामाजिकसंघटनांचे कार्यकर्ते एकवटले. वाहतुकीला अडथळा होऊ नये, याची काळजी घेत विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या एका बाजूला मानवी साखळी तयार करत शांततेच्या मार्गानेनिषेध नोंदवला. हातात मागण्यांचे फलक आणि घोषणांची पोस्टर घेऊन उभ्याअसलेल्या विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगेनेनागरिकांचे लक्ष वेधून घेतले. दिल्लीत जंतर-मंतर येथे सीजेपीचेअभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन सुरू आहे. नीट पेपर घोटाळ्याच्यानिषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्रप्रधान यांनी राजीनामा द्यावा, यामागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूआहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीदेशभरातून आवाज उठत असून, त्याचाचएक भाग म्हणून अहिल्यानगरातहीविद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. शुक्रवारी दुपारी दिल्लीगेट परिसरातविद्यार्थी एकत्र येण्यास सुरुवात झाली.सुरुवातीला दिल्लीगेटपासून सिद्धीबागेपर्यंतविद्यार्थ्यांची रांग लागली. एक विद्यार्थीजोडला की रांग पुढे वाढत होती. पोस्टर ठरले नागरिकांच्याकुतूहलाचा विषय
विद्यार्थ्यांच्या हातातील विविध मागण्यांचेफलक आणि पोस्टर हे आंदोलनाचे विशेषआकर्षण ठरले. एनटीए रद्द करा!, धर्मेंद्रप्रधान राजीनामा द्या!, “जुल्मी जब-जबजुल्म करेगा, सत्ता के हथियारोंसे, चप्पाचप्पा गुंज उठेगा इंकलाब के नारो से!,दिल्ली पुलिस मुर्दाबाद,३२ करोड हैबेरोजगार, कौंन है इसका जिम्मेदार! अशाघोषणा या फलकांवर होत्या. रस्त्यानेजाणारे अनेक नागरिक विद्यार्थ्यांच्याहातातील पोस्टर वाचण्यासाठी काही क्षणथांबत होते. त्यामुळे दिल्लीगेट परिसरातआंदोलन सुरू असताना नागरिकांमध्येहीया विषयाची चर्चा रंगली.
Source link
मानवी साखळी अन् मार्च काढून दिल्लीतील लाठीमाराचा निषेध:केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याराजीनाम्याची मागणी