Headlines

मान्सूनचे रौद्ररूप:मुंबई, पुण्यात पावसाचे थैमान; 90 किमीच्या वाऱ्याने उडवली दाणादाण; 8 जुलैपर्यंत घराबाहेर पडू नका- मुख्यमंत्र्यांचे आवाहन




१६ दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन केलेल्या मान्सूनने मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत थैमान घातले. त्यामुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. ९० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने २९१ झाडे उन्मळली. ८ जुलैपर्यंत नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवारी मुंबईतील मानखुर्द येथे चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाटण (जि. पुणे) येथे दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला. इतर विविध घटनांत चौघांचा प्राण गेला. मुंबई विद्यापीठाची सोमवारची परीक्षा रद्द करण्यात आली. शिवाय ७ जुलै रोजी शाळा, कॉलेजना सुटी जाहीर करण्यात आली. मुंबईकडे येणारी ५ विमाने अन्यत्र वळवण्यात आली. लांब पल्ल्याच्या १० रेल्वे रद्द करण्यात आल्या. पुण्यामध्ये तर पावसाने हाहाकार उडवला. लोणावळ्यात २४ तासांतच ६७० मिमी पाऊस झाला. मुंबई, कोकणात ४ दिवस जाेरदार तर संभाजीनगरात तुरळक पाऊस होणार हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, कोकणात १० जुलैपर्यंत जाेरदार पाऊस आहे. मात्र, याच कालावधीत छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात तुरळक पाऊस हाेणार आहे. सध्या अरबी समुद्रात गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान हवेच्या कमी दाबाचा तीव्र लांब पट्टा सक्रिय आहे. यामुळे समुद्रावरील अति-बाष्पयुक्त मोसमी वारे वेगाने सह्याद्रीच्या डोंगररांगांकडे झेपावत आहेत. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या प्रणालीमुळे मोसमी वाऱ्यांची गती आणि बाष्प वाहून नेण्याची क्षमता दुप्पट झाली आहे. म्हणून मुंबई, कोकणात १० जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडेल. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा असेल. पुणे, सांगली, सातारा या भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना अलर्ट : मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना १० जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला. पुणे, सातारा, सांगलीत १० जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे. पाटण गावात दरड कोसळली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 23 जणांना सुरक्षित स्थळी नेले
पुणे | मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या पाटण गावात सोमवारी (६ जुलै) पहाटे ५:५० च्या सुमारास दरड घरावर कोसळल्याने एकाच कुटुंबातील नंदू तिकोने, अनिता नंदू तिकोने आणि माउली तिकोने मरण पावले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफचे ३० जवानांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चिखल आणि कोसळणाऱ्या पावसात बचावकार्य राबवून ढिगाऱ्याखालून तीन व्यक्तींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून परिसरातील इतर २३ नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. नाशिकमध्ये आज हाय अलर्ट: एनडीआरएफ, एसडीआरएफ तुकड्या तैनात : मुख्यमंत्री नाशिक ग्रामीण भागात मंगळवारी पहाटे तब्बल ३५० मिमी पावसाच्या शक्यतेसह ‘ढगफुटी’चा गंभीर इशारा देण्यात आल्याने एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ही माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातच नाशिक येथे ढगफुटीचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. महाराष्ट्र – नाशिक येथे ढगफुटीचा इशारा, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद:हवामान खात्याने जारी केला हाय अलर्ट; शाळा – कॉलेज बंद सलग होणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने या भागात ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, पुढील २४ तासांत ३०० मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दरम्यान ढगफुटीची शक्यताही वर्तवली आहे. पावसामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, काल रात्रीपासून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, मेटघर किल्ला परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *