Headlines

मुंबईतील शालेय मुलांसाठी नवी मैदाने आणि सायकल ट्रॅक!:CM देवेंद्र फडणवीसांची विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा




मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ‘सुजाण नागरिक सक्षम भारत’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनमूल्यांवर आधारित नव्या नागरिक अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उपस्थिती लावली आणि शालेय विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचून दाखवत संविधानाचे धडे दिले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सर्वांनी आपले मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये समजून घेतली पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध मोठा संघर्ष केला, मात्र कोणतीही कटुता मनात न बाळगता त्यांनी देशाचे महान संविधान तयार केले, अशी शिकवण त्यांनी दिली. या संवादानंतर मुख्यमंत्र्यांनी शालेय मुलांसाठी मोठ्या घोषणा करत त्यांना आनंदाची बातमीही दिली. विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार मुंबईत खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देणार आहे. मुलांसाठी सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत. पुढे फडणवीस म्हणाले, मी मुंबई महापालिकेचे अभिनंदन करतो. सुंदर उपक्रमाची सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना उद्याचा नागरिक घडला पाहिजे. जगभरातील माहिती विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन माध्यमातून प्राप्त होते. त्यांचे व्यक्तिमत्व या माहितीमधून तयार होते. विद्यार्थ्यांना उपदेश पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक हुशार पिढी देशात तयार करत आहोत. पण उत्तम नागरिक म्हणून आपले अधिकार आणि संवेदनशीलता तयार केली नाही तर शिक्षित तयार करू. पण ती समाजाला प्रेरक नसेल समाजाप्रती आपले कर्तव्ये आहे. याचे भान राहिले नाही तर देशाला आवश्यक प्रगती करता येणार नाही. स्मार्ट नागरिक घडवायचे म्हणजे त्यांना आपले अधिकार आणि कर्तव्ये माहिती असले पाहिजेत. जीवनात काही तरी करण्यासाठी समाजाने तयार केलेली व्यवस्था आहे. याची जाण असलेली पिढी तयार करावी लागेल. त्यासाठी काही मूल्य पिढीमध्ये रुजवली पाहिजे. ही तीच संविधानिक मूल्य आहेत. आपले संविधान 100 वर्षांनंतरही साजेसे राहील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मूल्य अंगीकारली तर विकसित भारताचे सारथी म्हणून आम्हाला काम करता येईल. जीवनात ही मूल्य समजलेले कधीही अपयशी होऊ शकत नाही. अशा विचारातून विद्यार्थी प्रेरणा व स्मार्ट नागरिक ही संकल्पना मांडली आहे. भारताचे संविधान असे आहे, ज्याने भविष्याचा वेध घेतला आहे. बदलत्या काळासाठी साजेसे आहे. 100 वर्षानंतर ही ते साजेसे राहील. संविधानाने दिलेले तत्व आणि मूल्य ही कधीही कालातित होऊ शकत नाही. जगातील सर्व संविधानाचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. पण या मातीतील मूल्य समजून संविधान तयार केले. त्यामुळे भारताचा प्रगतीत सर्वात मोठे उपकरण हे संविधान आहे. म्हणून मोदीजी म्हणाले कुठल्याही धर्मग्रंथ यापेक्षा मोठे संविधान आहे. आपण मानवतेची तत्व विसरलो म्हणून 1 हजार वर्ष गुलामगिरीत राहिलो. आज संविधानाने ती समानता प्रस्थापित करून दाखविली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *