![]()
मुंबईत झाडे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी चेंबूर येथे झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज पवईतील आयआयटी मार्केट परिसरातही अशीच घटना घडली आहे. भररस्त्यात एका चारचाकी वाहनावर महाकाय झाड कोसळले. यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालकाला सुरक्षित बाहेर काढले. घटनेत चालक जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. भररस्त्यात अचानक झाड कोसळले ही घटना पवई येथील आयआयटी मार्केट परिसरात घडली. पावसामुळे मऊ झालेल्या जमिनीमुळे आणि वाऱ्याच्या जोरामुळे मोठे झाड अचानक उन्मळून पडले. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावर हे झाड कोसळले. झाडाच्या फांद्यांखाली वाहन पूर्णपणे अडकले आणि चालकाला बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दलाची तातडीची मदत घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने विशेष उपकरणांच्या मदतीने झाडाच्या फांद्या हटवत वाहनात अडकलेल्या चालकाला सुरक्षित बाहेर काढले. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. कारचे मोठे नुकसान, वाहतुकीवर परिणाम झाड कोसळल्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. काही काळ या परिसरातील वाहतूकही विस्कळीत झाली होती. अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी झाड हटवून रस्ता मोकळा केला, त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. चेंबूरमध्ये झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा
काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. त्या घटनेनंतरही शहरात झाडे कोसळण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळ्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडांची वेळेत पाहणी आणि छाटणी करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. संबंधित बातमी वाचा.. चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना!: स्कूल बसवर मोठे झाड उन्मळून पडले, 4 विद्यार्थी जखमी; 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू मुंबईतील चेंबूर परिसरात एक भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली. येथील ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक उन्मळून कोसळले. या दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, ४ शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. सविस्तर वाचा
Source link
मुंबईत पुन्हा झाड कोसळले:पवईतील IIT मार्केटमध्ये कारचे मोठे नुकसान, चालक थोडक्यात बचावला