Headlines

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा वेगवान टप्पा:समुद्राच्या खालून बोगद्यासाठी दुसऱ्या महाकाय ‘टीबीएम’चे आगमन; जुलै 2026 पासून प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती




मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील २१ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी आता गती मिळाली आहे. विक्रोळीनंतर आता सावली (घनसोली) येथे दुसऱ्या महाकाय टनेल बोअरिंग मशीनचा (टीबीएम) “कटरहेड’ यशस्वीरीत्या खाली उतरवण्यात आला आहे. १३.६ मीटर व्यासाचा हा कटरहेड म्हणजे इंजिनिअरिंगच्या दृष्टीने एक नवा चमत्कार मानला जात असून यासह आता बुलेट ट्रेनच्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. बुलेट ट्रेनच्या २१ किमी लांबीच्या भुयारी मार्गासाठी आता दोन्ही बाजूंनी कामाचा धडाका सुरू झाला आहे. १३.६ मीटर व्यासाचा आणि ३५० टन वजनाचा हा कटरहेड म्हणजे टीबीएमच्या मुख्य शील्डच्या उभारणीचा शेवटचा टप्पा आहे. दोन्ही टीबीएम आता अंतिम असेंब्ली आणि तांत्रिक चाचण्यांमधून जाणार असून जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यापासून त्यांची प्रत्यक्ष “ड्राइव्ह’ सुरू होईल. सावली (घनसोली) ते विक्रोळी यादरम्यान होणारे हे काम देशातील पायाभूत सुविधांच्या विकासातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरणार आहे. तांत्रिक वैशिष्ट्य असे: यंत्रात ८४ कटर डिस्क, १२४ स्क्रॅपर व १६ बकेट लिप्स 1. महाकाय आकार : १३.६ मीटर व्यासाचे कटरहेड एकाच वेळी “अप’ आणि “डाऊन’ अशा दोन्ही लाइनसाठी एकच बोगदा खोदण्यास सक्षम आहे. 2. अत्याधुनिक रचना: या यंत्रात ८४ कटर डिस्क, १२४ स्क्रॅपर आणि १६ बकेट लिप्स आहेत, जे खडकाळ भूगर्भातही माती आणि दगड अत्यंत कार्यक्षमतेने बाहेर काढतील. 3. सुरक्षितता आणि वेग: या टीबीएमची कमाल गती ४ RPM (रिव्हाेल्यूशन प्रतिमिनिट) असून ४९ मिमी प्रति मिनिट या नियंत्रित वेगाने खुदाई होणार आहे, ज्यामुळे कामात अचूकता आणि सुरक्षेचे उच्च मानक राखले जाईल. 4.टीबीएमचा तपशील: एकूण दोन टीबीएम वापरले जाणार असून, त्यांचे वजन अनुक्रमे ३०८० आणि ३१८४ टन आहे. प्रत्येक मशीनची एकूण लांबी ९५.३२ मीटर आहे. 5. जटिल यंत्रणा: या मशिनरीमध्ये कटर व्हील, मेन बेअरिंग, जॉ क्रशर आणि चार विशेष गॅन्ट्रीचा समावेश आहे, जे टनेलच्या उभारणीसाठी आवश्यक आधार देतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *