Headlines

मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणावर मनपाचा हातोडा:वाहतूक कोंडी करणारे कच्चे-पक्के बांधकाम करण्यात आले निष्कासित‎




शहरातील मुख्य रस्त्यांवर झालेले अतिक्रमण वाहतुकीस मोठा अडथळा ठरत असल्याने आयुक्त सुनील लहाने यांच्या आदेशान्वये सोमवारी धडक मोहीम राबवण्यात आली. मनपा सहाय्यक आयुक्त गणेश शहाणे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण निर्मुलन पथकाने उत्तर झोनमधील खुले नाट्यगृह, इंदोर गल्ली ते फतेह चौक या प्रमुख मार्गांवरील कच्चे व पक्के अतिक्रमण पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोहिमेत सिटी कोतवालीचे ठाणेदार संजय गवई, सहाय्यक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे यांच्यासह कनिष्ठ अभियंता आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी केवळ साहित्य जप्त न करता, पुन्हा अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिक आणि वाहनधारकांवर मोठा आर्थिक दंड आकारावा, जेणेकरून नियमांचे उल्लंघन होणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *