Headlines

राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना नवनीत राणांचा पूर्णविराम:म्हणाल्या- मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ता, विचारधारेशी तडजोड नाही




राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांना खासदार नवनीत राणा यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे. कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी पक्षांतराच्या सर्व शक्यतांना फेटाळून लावले. राज्यसभा उमेदवारीसंदर्भातील पडद्यामागील घडामोडींवरही त्यांनी प्रथमच भाष्य केले. सोशल मीडियावर पोस्ट करत नवनीत राणा यांनी राज्यसभा उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले. आदरणीय सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट मला मान्य नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पक्षांतराचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्या म्हणाल्या. नवनीत राणा यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार त्यांनी सुनेत्रा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची जागा भाजपसाठी सोडण्याची विनंती केली होती. मात्र काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. तरीही माझ्यावर विश्वास ठेवून राज्यसभेसाठी संधी देण्याचा विचार केल्याबद्दल सुनेत्रा पवार, अजित पवार आणि पार्थ पवार यांची मी ऋणी असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, नवनीत राणा यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून त्या आगामी काळात भाजपमध्येच सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर राजकीय वर्तुळातील विविध तर्क-वितर्कांनाही विराम मिळाल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा पुढे ढकलला: नडीएच्या महत्त्वाच्या बैठकीमुळे तारखांमध्ये बदल, 10 ऐवजी 11 जूनला होणार! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यंदाचा 27 वा वर्धापन दिन एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला असून, आता हा सोहळा गुरुवार, 11 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतील किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. दरवर्षी 10 जून रोजी साजरा होणाऱ्या या पक्षीय सोहळ्याच्या तारखेत नवी दिल्लीत ‘एनडीए’ची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याने बदल करण्यात आला आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *