Headlines

यंत्रणांनी खरीपमध्ये बियाणे, खत पुरवठा करण्यासाठी सावध राहावे:नियोजन व्यवस्थित करण्याचे आ. रणधीर सावरकर यांचे निर्देश‎




अकोला तालुका खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. कृषी विभागाने खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी कराल, असे आदेश आ. रणधीर सावरकर यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिला. गत वर्षी जून महिन्याच्या अखेरीस अतिवृष्टी झाली. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या दीड आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. अशातच उन्हाळ्यातही अवकाळी पावसामुळे पिकांची हानी झाली. त्यामुळे आता आगामी खरीप हंगामातून शेतकऱ्यांना आशा असून १३ एप्रिल रोजीच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. आढावा बैठकीचे आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. खरीप हंगाम २६-२७साठी शेतकऱ्यांना उपलब्ध करावयाच्या बी, बियाणे, खते, कीटकनाशक तसेच पेरणी पूर्वी करावयाची तयारी या संबंधाने आमदार सावरकर यांनी सविस्तर आढावा घेतला. तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी आढावा सभेच्या अहवालाचे बाबनिहाय वाचन केले. गत ५ वर्षातील खरीप हंगामातील उत्पादकता बियाणे व खतांची मागणी आणि उपलब्धता इत्यादी बाबी सविस्तर पणे सभागृहाला अवगत केल्या. बैठकीत तालुक्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र वितरीत करून सत्कार करण्यात आला. या बैठकीला डॉ. घाटोळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव, कृषी उप संचालक हरीश देशमुख, प्रकल्प उप संचालक आत्मा प्रेमसिंग, सहाय्यक पशु संवर्धन आयुक्त डॉ. राठोड सहाय्यक, पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे, डॉ. उमेश ठाकरे, गटविकास अधिकारी पटोकार, भरत कालमेघ, राजेश बेले, अंबादास उमाळे, शंकरराव महल्ले, संतोष शिवरकर, बाबू पाटील गावंडे आदी उपस्थित होते. असे आहे नियोजन : खरीप हंगामात यंदा अकोला तालुक्यात सुमारे ९१ हजार ३६८ हेक्टरवर पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कपाशी ४१ हजार हेक्टर, सोयाबीन ३८ हजार ०० हेक्टर आणि तूर १० हजार ५० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मागणीनुसार व्यवस्थित व्हावा पुरवठा आगामी खरीप हंगामात पिकांचा होणारा पेरा, पिकांची फेर पालट आदी सर्व बाबींचा अंदाज घेऊन कृषी निविष्टांचे काटेकोर नियोजन करण्यात यावे. या वर्षी कपाशीचा पेरा वाढण्यासोबतच सोयाबीनचा पेरा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पिकांचा कमी जास्त होणारा पेरा लक्षात घेऊन बियाण्याची मागणी तसेच बियाणे कंपन्यांकडून होणारा पुरवठा याचा ताळमेळ साधण्यात यावा. कोणत्याही परिस्थित शेतकऱ्यांना कोणत्याही सानास्येला सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी अशी सूचना आमदार सावरकर यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना केल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *